🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

IFFCO मध्ये भरती सुरु, 70 हजार रुपयांपर्यंत पगार, लगेच करा अर्ज

IFFCO मध्ये भरती सुरु, 70 हजार रुपयांपर्यंत पगार, लगेच करा अर्ज


इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) द्वारे अ‍ॅग्रीकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी (AGT) या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशभरातील कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात अथवा गरजेनुसार नियुक्ती दिली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


शैक्षणिक पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 1 सप्टेंबर 2026 पर्यंत 30 वर्षे असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांची वयोमर्यादा शिथिलता देण्यात आली आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून चार वर्षांची पूर्णवेळ नियमित B.Sc. (Agriculture) पदवी असणे अनिवार्य आहे.
अर्जाची अंतिम तारीख

शैक्षणिक पात्रतेमध्ये गुणांची टक्केवारी महत्त्वाची असून, सर्वसाधारण (General) व इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी B.Sc. (Agriculture) मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. तसेच अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 55% गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या अटींची पूर्तता करणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑक्टोबर आहे.

वेतन किती मिळणार?
प्रशिक्षण कालावधीमध्ये म्हणजेच पहिल्या एका वर्षासाठी उमेदवाराला प्रतिमहिना 33,300 रुपये स्टायपेंड (मानधन) दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आणि संस्थेच्या आवश्यकतेनुसार, उमेदवारांना रुपये 37,000 ते 70,000 रुपये या वेतनश्रेणीत समाविष्ट केले जाईल; तसेच संस्थेच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभ देय राहतील. अधिक माहितीसाठी www.iffco.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.