सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केला आहे. MPDA कायद्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शरद कोळीवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. खरं तर कारवाईचे आदेश जाहीर झाल्यापासून शरद कोळी फरार होते. मात्र आज सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोळी यांना सांगलीतून ताब्यात घेतलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर आठवडाभरापूर्वीच MPDA कायद्यानुसार कारवाईचे आदेश जाहीर करण्यात आले होते. या कारवाईचा आदेश जाहीर झाल्यापासून शरद कोळी फरार होते. मात्र काही वेळापूर्वी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोळी यांना सांगलीतून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता MPDA कायद्यानुसार शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब यांचे आदेश क्रमांक २०२६/डी.सी. बी/२/आरआर/४७६१(१)/२०२६ दि. १७/०९/२०२६ अन्वये जिल्हाधिकारी साहेब यांनी वरील आदेशाप्रमाणे महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कला कृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेक्स) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणा-या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणा-या आणि मानवी अपव्यापार करणा-या व्यक्ती यांचा विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम १९८१, यात सुधारणा १९९६, २००९, २०१५ व २०२५चे कलम ३(१) प्रमाणे स्थानबद्ध शरद विठ्ठल कोळी (वय ३७) वर्षे रा. अर्धनारी, ता. मोहोळ जि. सोलापूर यास एक वर्षा करीता येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. शरद कोळी यांच्यावरती वाळू चोरी, खंडणी मागणी, प्रक्षोभकारक बोलेन अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.