सांगली :- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या आणि राजकीयदृष्ट्या चर्चेत राहिलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत विविध गटांतून दिग्गज नेत्यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रमुख मतदारसंघांतील निकाल व मतांची आकडेवारी:
मिरज गट: मिरज गटातून अण्णाप्पा कोरे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी अनिल शेगुणशी यांचा ४६ विरुद्ध २२ अशा २४ मतांच्या फरकाने (शेगुणशी यांना २२ मते मिळाली) पराभव करत विजय संपादन केला.
जत गट: जत मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ५४ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा (विनोद पवार - ३४ मते) २० मतांनी पराभव केला.
तासगाव गट: तासगाव गटात जोरदार लढत पाहायला मिळाली. यामध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांनी ४० मते मिळवून विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुमनताई पाटील यांना ३८ मतांवर समाधान मानावे लागले.
कवठेमहांकाळ गट: कवठेमहांकाळ गटातून माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी ३७ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी टी. व्ही. पाटील (३४ मते) यांचा ३ मतांनी पराभव केला. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का आणि राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली होती. दिग्गजांच्या या विजयामुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून समर्थकांनी ठिकठिकाणी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.