🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"'बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात,' विजय वडेट्टीवारांचा पवारांवर जहाल वार"

​"'बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात,' विजय वडेट्टीवारांचा पवारांवर जहाल वार"

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरुन भाजपप्रणित एनडीए आघाडीला साथ देण्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांची राजकीय प्रतिमा पुन्हा एकदा कलुषित होण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन पक्षात फूट पडू शकते, असे कारण काँग्रेस नेतृत्त्वाला कळवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सोमवारी लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक मांडल्यावर शरद पवारांची राष्ट्रवादी त्याच्या बाजूने मतदान करणार, हे जवळपास स्पष्ट आहे. 

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीका केली आहे. शरद पवार यांचा इतिहास हा खंजीर खुपसण्याचाच आहे. भाजपला साथ द्यायचा निर्णय बापलेकीने मिळून घेतलाय, सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात असते, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ते शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

शरद पवार साहेब 86 वर्षांचे आहेत. संपूर्ण आयुष्य त्यांनी पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. असा नेता जातीयवादी, धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करुन त्यांच्यासोबत जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं. पण पवारांचा इतिहासा हा खंजीर खुपसण्याचा आहे, हे महाराष्ट्रातील लोकांन माहिती आहे. अनेकदा तशी परिस्थिती आली तेव्हा हे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसाठीच बनला आहे. सत्तेशिवाय जगणं या पक्षाला मान्यच नाही, त्यांना कुठलाही विचार नाही, हे सिद्ध झाले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. 

आम्ही सगळ्यांनी मिळून शरद पवार यांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या रुपाने राज्यसभेत फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार राहिला पाहिजे, हे त्यामागील कारण होते. पण आता हा विचार संपवण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे. डिलिमिटेशनंतर देशात जी परिस्थिती निर्माण होईल, लोकशाही संपवण्याच्या ज्यांचा वाटा आहे, त्यांची यादी निघेल, त्यामध्ये शरद पवार यांचे नाव असेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

10 आमदारांच्या जोरावर सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्रि‍पदाची मागणी हास्यास्पद: विजय वडेट्टीवार

डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर संविधान संपेल, लोकशाही संपेल, उद्या देशात निवडणुकाच होणार नाहीत. डिलिमिटेशनमुळे देशात हुकुमशाही येईल. शरद पवार यांच्या पक्षाचा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. 10 आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपद मागणे हे हास्यास्पद आहे. भाजपने शिंदे गटाकडे 60 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. पण सुप्रिया सुळे डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असतील म्हणून त्यांना भाजप मुख्यमंत्री बनवणार असेल तर आनंद आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

शरद पवार हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक,सामाजिक विचाराला पायदळी तुडवण्याचं पाऊल उचलणार असतील, तर ते त्यांना लखलाभ आहे. पक्ष फुटणार म्हणून पाठिंबा दिला, यामध्ये कितीही तथ्य आहे माहिती नाही. सुप्रिया सुळे यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास पाहता त्या सत्तेत जातील, असे वाटत होते. या लोकांना विचार नाही. हे केवळ सत्तेसाठी जन्माला आले आहेत, सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे. दोघेही बापलेक निर्णय़ घेतात, भाजपला साथ देण्याचा निर्णय घरात मिळून घेतला आहे, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.