महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून केंद्र सरकारने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे.
या अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. त्याआधी आज आठवड्यातून दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात या विधेयकावर चर्चा होण्याचे संकेत मिळत असून काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी ही माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे अधिवेशन पुन्हा बोलावण्याची विनंती सरकार मार्फत करण्यात आली आहे. लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज 3 डिसेंबरपासून सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारी कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबरला संपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या विधेयकासंदर्भातील मंजुरीची सर्व 30 खासादांवर अवलंबून आहेत. नेमकं हे गणित काय समजून घेऊयात...
विधेयक मंजूर करण्यासाठी 361 मतांची गरज
घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत दोनतृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या 543 सदस्यसंख्येनुसार त्यासाठी 361 मतांची गरज आहे. तीन जागा रिक्त असल्याने सध्या लोकसभेत 540 सदस्य आहेत. सत्ताधारी रालोआकडे सुमारे 320 खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसमधील 20 बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन करून भारतीय राष्ट्रीय नागरिक पक्षात (एनसीआयपी) विलीन होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. तरीही सरकारला अतिरिक्त पाठिंब्याची गरज आहे. द्रमुकचे 22 आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ खासदार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. या 30 खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं तर विधेयक समर्थकांची संख्या 350 च्या आसपास पोहचेल.
सध्याचे लोकसभेतील पक्षीय बलाबल
भाजप - 241
नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI)- 20
तेलुगू देसम पार्टी (TDP) - 16
शिवसेना (एकनाथ शिंदे) - 13
जनता दल (युनायटेड) - 12
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) - 5
जनता दल (सेक्युलर) - 2
जनसेना पार्टी - 2
राष्ट्रीय लोकदल - 2
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- 1
अपना दल (एस)- 1
आसाम गण परिषद- 1
AJSU- 1
HAM (सेक्युलर)- 1
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा - 1
एकूण पाठिंबा : सुमारे 319
विरोधी पक्षाचे खासदार
काँग्रेस - 98
समाजवादी पार्टी - 37
द्रमुक (DMK) - 22
तृणमूल काँग्रेस - 8
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 8
राष्ट्रीय जनता दल - 4
CPI (मार्क्सवादी) - 4
झारखंड मुक्ती मोर्चा - 3
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 3
आम आदमी पार्टी - 3
इंडियन युनियन मुस्लिम लीग - 3
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स - 2
CPI - 2
CPI (ML) लिबरेशन - 2
VCK - 2
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.