🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"घरात घुसूनच मारणार!" सांगलीत जयंत पाटलांच्या उपस्थितीतच गोपीचंद पडळकरांची डरकाळी; मंचावर प्रचंड गोंधळ

​"घरात घुसूनच मारणार!" सांगलीत जयंत पाटलांच्या उपस्थितीतच गोपीचंद पडळकरांची डरकाळी; मंचावर प्रचंड गोंधळ


राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. आज हेच विरोधक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना गोपिचंद पडळकरांनी नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. 'शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नसतं.त्यांच्यात घुसून त्यांचा कार्यक्रम करायचा असतो, अशा शब्दात पडळकरांनी टीकेचा बाण सोडला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.




सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावचीमध्ये आमदार जयंत पाटील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर आले होते. जयंत पाटील व्यासपीठावर असताना गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एंट्री होताच एकच गोंधळ उडाला होता.

जयंत पाटील समर्थक व गोपीचंद पडळकर- खोत समर्थकांकडून एकमेकांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमांमध्ये गोपीचंद पडळकरांची उपस्थिती होती. यावेळी बावची येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील आमदार हर्षदा देशमुख यांचीही उपस्थिती होती. 



दरम्यान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एंट्री होताच एकच गोंधळ उडाला होता.या गोंधळानंतर जयंत पाटलांनी आपल्या समर्थकांना शांततेचा आवाहन केल्यानंतर घोषणाबाजी थांबली. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना आपण सुसंस्कृतपणानं वागायचं असतं, आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना शातंतेचा सल्ला दिला. त्यानंतर व्यासपीठावर गोपीचंद पडळकर यांचा आयोजकांना सत्कार करायला लावत, दोन्ही बाजूने सुरू असलेली घोषणाबाजी थांबवली.




यानंतर व्यासपीठावरून बोलताना गोपिचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगितला. हा इंतिहास सांगताना ते म्हणाले 'शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नसतं.त्यांच्यात घुसून त्यांचा कार्यक्रम करायचा असतो', अशा शब्दात गोपिचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर निषाणा साधल्याचे बोलले जात आहे. तसेच शाहिस्तेखान जेव्हा शनिवार वाड्याला आला, त्यावेळी लाखाची फौज त्याच्यावर होती. पण शिवाजी महाराज काही मोजक्या मावळ्यांसोबत गेले आणि त्यांची बोट छाटून आले, तिथे जाऊन कार्यक्रम करून आले,असे देखील गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.