🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दादर स्थानकाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा यू-टर्न की नवा डाव? 'चैत्यभूमी' नावासाठी आता 'या' स्थानकाची निवड!

दादर स्थानकाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा यू-टर्न की नवा डाव? 'चैत्यभूमी' नावासाठी आता 'या' स्थानकाची निवड!




दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण केले जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' हे नाव देण्यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक त्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. 



दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विधिमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक पूर्तता अधिवेशनात पूर्ण करून या नामकरणाची कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सोयीसुविधा, सुरक्षा आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.



दादर स्थानकाचे नाव 'चैत्यभूमी' करण्यास शिंदेसेनेचा विरोध, शिशिर शिंदे यांचा भाजपवर

दादर स्थानकाचे नाव 'चैत्यभूमी' करण्याचा प्रयत्न म्हणजे मुंबईत अशांतता निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप शिंदेसेनेचे शिशिर शिंदे यांनी भाजपवर केलाय. यातून मराठी माणसात फूट पाडण्याचा आणि त्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केलाय.






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.