दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने रंगभूमी दिन संपन्न..
नाट्यगृहाला.. पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची नगरसेवक केदार खाडिलकर यांची मागणी
सांगली :-गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त महापालिकेच्या दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात,
महापालिकेच्या वतीने नगरसेवक श्री केदार खाडिलकर यांच्या हस्ते नटराज पूजन करून रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बेलवलकर तसेच महापालिकेचे उपायुक्त
श्री पराग कोडगुले,
सचिन सावगावकर, रवींद्र चौगुले,
श्री संदीप कुकडे तसेच मालमत्ता विभाग व अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षापासून म्हणजे पुरानंतर नाट्यगृहाचे खूप नुकसान झाले आहे तेव्हापासून सदर नाट्यगृह बंद आहे.
नगरसेवक श्री केदार खाडीलकर यांनी नाट्यगृह आणि आसपासचा परिसर हा स्वच्छ आणि सुशोभित करून पुन्हा वापरात आणावा अशी मागणी यावेळी महापालिकेकडे केली.
नाट्य पंढरी सांगली मध्ये नाट्यगृहासारखी वास्तू अशी दुर्लक्षित आणि पडीक असणे हे अत्यंत खेदजनक आणि त्रासदायक आहे.. अशी भावना सर्वच नागरिकांची आहे.. याची दखल घेऊन
नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करून ते पुनर्वापरात यावे तसेच नाट्यगृहाच्या परिसरामध्ये जो भंगाराचा ढीग साठवलेला आहे तो तातडीने बाजूला करून ती जागा संपूर्ण स्वच्छ करून तो विविध प्रदर्शने, बचत गटाचे स्टॉल यासाठी वापरात आणावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच शेजारी असलेल्या साने गुरुजी उद्यान परिसर, त्याच्या दारातील अतिक्रमण बाजूला करून, उद्यान अजूनही सुंदर आणि चांगले करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली.
यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळू शकते.
तसेच नाट्यगृहाच्या आवारात असलेली जुनी लोखंडी पाण्याची टाकी ही एक पुरातन आणि जपण्यासारखी आणि पाहण्यासारखी वस्तू असून, देशांमध्ये अशा प्रकारच्या फक्त दोनच ठिकाणी टाक्या आहेत, एक कलकत्ता येथे आणि दुसरी सांगली येथे.. त्या मुळे अशा दुर्मिळ आणि पुरातन टाकीला सुद्धा विशेष आकर्षक रंगसंगती करून एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याचे रूपांतर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन करावे अशी मागणी केदार खाडिलकर यांनी यावेळी केली.
उपयुक्त पराग कोडगुले यांनी याबाबत पाठपुरावा करून तातडीने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या वास्तूच्या विकासासाठी गरज पडल्यास माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुद्धा आर्थिक मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन असे केदार खाडिलकर यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.