🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आपल्याच निरोपाची तयारी आपल्याच हाताने! दिल्लीत 'जिवंतपणीच' होतेय अंतिम संस्काराची बुकिंग; काळजाला चिर पाडणारं वास्तव.

आपल्याच निरोपाची तयारी आपल्याच हाताने! दिल्लीत 'जिवंतपणीच' होतेय अंतिम संस्काराची बुकिंग; काळजाला चिर पाडणारं वास्तव.


मृत्यू कुणालाच टळला नाही. तो कधी येईल हेही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकजण मृत्यूपूर्वी आपलं मृत्यूपत्र करतात. संपत्तीचं वाटप करून टाकतात. आपल्या मागे वाद होऊ नये हा त्यामागचा हेतू असतो.  




पण लोक जिवंत असतानाच अंतिम संस्काराचं बुकिंग करु लागले तर? दिल्लीत हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. वाचण्यास थोडं अजब वाटेल. पण बातमी खरी आहे. दिल्लीत एक अनोखी स्टार्टअप 'संस्कार सेवा' सुरू झाली आहे. त्यानुसार लोक आधीच अंतिम संस्काराची बुकिंगं करत आहेत.


साधारणपणे आपल्या प्रियजनाचा मृत्यू झाल्यावर लोकांना धक्का बसतो. अशावेळी अंतिम संस्कार कसे करायचं हे लक्षात येत नाही. घाट, पंडित, पूजेची सामग्री तसेच वाहनांची व्यवस्था करणं कुणाच्या लक्षात येत नाही. सर्वच दु:खात असतात. त्यामुळे या गोष्टीचं कुणाला भान राहत नाही. हाच त्रास दूर करण्यासाठी ही अॅडव्हान्स बुकिंग सेवा सुरू झाली आहे. 




लोकही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत. आपल्या निधनानंतर कुटुंबाला ही व्यवस्था करण्यास अडचण येता कामा नये, या यामागचा हेतू आहे. या कंपनीचे डायरेक्टर विश्व कंदर्प यांनी याबाबतची माहिती दिली. 300 हून अधिक लोकांनी या अनोख्या सर्व्हिसमध्ये बुकिंग केलं आहे. अनेक लोकांनी आपल्या जिवंतपणीच ही बुकिंग केली आहे, असं कंदर्प यांनी सांगितलं.


तीन खास पॅकेज

या स्टार्टअपमध्ये लोकांना सवलत मिळावी आणि त्यांच्या बजेट पाहता तीन वेगवेगळे पॅकेज तयार करण्यात आले आहेत. 29,999 रुपये हे बेसिक पॅकेज आहे. त्यानंतर 69,999 रुपयांचं मध्यम पॅकेज आणि 1.49 लाख पर्यंतचं प्रीमियम पॅकेज आहे. या पॅकेज अंतर्गत अंतिम संस्काराच्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींची पूर्तता केली जाणार आहे. यात पार्थिव शरीर घेऊन जाण्यासाठी शव वाहन, तिरडी, पंडित, पूजेची सर्व सामग्री आणि फुलांची सजावट आदी गोष्टींचा समावेश आहे.

सर्व काही मिळणार

याशिवाय अस्थि एकत्र करणं, विसर्जनासाठी नाव आणि घाटाची व्यवस्था आदीपासून श्राद्ध आणि शांतीपाठ आदी सर्व धार्मिक रितीरिवाज सन्मानपूर्वक केले जाणार आहेत. ही सर्व जबाबदारी स्टार्टअप घेणार आहे. 


जे लोक एकटे राहतात, अशा लोकांसाठी ही सर्व्हिस मोठा आधार ठरणार आहे. काही लोकांची मुलं परदेशात राहतात. त्यामुळे त्यांना भारतात येणं शक्य नसतं. अशावेळी त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी ही सर्व्हिस उपयुक्त ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.