🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! कोल्हापुरात 'जीबीएस' आजाराची दहशत; कळंब्यातील शाळकरी मुलाच्या मृत्यूने प्रशासन खडबडून जागे, घरोघरी तपासणी सुरू

सावधान! कोल्हापुरात 'जीबीएस' आजाराची दहशत; कळंब्यातील शाळकरी मुलाच्या मृत्यूने प्रशासन खडबडून जागे, घरोघरी तपासणी सुरू


कंदलगाव : 'गुइलेन-बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) ने काल कळंबा येथील राजवर्धन नितीन बुचडे (वय ११, सध्या रा. महालक्ष्मी गल्ली, कळंबा, मूळ गाव कुडित्रे) याचा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  दरम्यान, कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कळंबा गावात घरोघरी आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली (Guillain Barre Syndrome cases in Kalamba Kolhapur) आहे. 




महालक्ष्मी गल्ली, राम गल्ली, हनुमान गल्ली, टिपुगडे गल्ली आणि तिवले गल्ली येथे तपासणीवर भर आहे. जिल्हा परिषद सदस्या विनीता भोगम आणि सरपंच सुमन गुरव यांनी आवाहन केले की, नागरिकांनी न घाबरता आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे.


आणखी दोघांची प्रकृती गंभीर

'जीबीएस' सिंड्रोम सदृश लक्षणे असलेल्या सात रुग्णांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. यातील दोघे गंभीर आहेत. उर्वरित पाचजणांची प्रकृती स्थिर आहेत. याबाबतची तपशीलवार माहिती वैद्यकीय अधीक्षक वा अधिष्ठातांकडून मिळू शकली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत याबाबतची माहितीच पोहोचलेली नाही, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे गावातील जलवाहिनीत सांडपाणी मिसळते का, याची तपासणी करत आहोत. आशा सेविकांची बैठक घेऊन तपासणीचा कालावधी वाढवला.

-डॉ. भूषण मस्के, वैद्यकीय अधिकारी, कणेरी




'अफवांवर विश्‍वास ठेवू नका'

जीबीएसबाबत आरोग्य विभागाने सांगितले की, जीबीएस संसर्गजन्य नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र, हात-पायांना मुंग्या येणे, पायांमध्ये अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आरोग्‍य तपासणी मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के, आरोग्य साहाय्यक अनिल पोवार, डॉ. स्मिता पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी पद्मावती पाटील, आरोग्य सेविका प्रभादेवी कर्णिक, श्रेयश पुजारी, अभिजित काटकर आदी सहभागी आहेत.






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.