"दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःचा कारखाना सांभाळा; भीमा साखर कारखान्याच्या दुरवस्थेवरून सतेज पाटील धनंजय महाडिकांवर कडाडले!"
राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड अखेर आज संपन्न झाली. न्यायालयाने अंतिम निर्णयासाठी तारीख राखून ठेवली असली तरी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर, आज चेअरमनपदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात, महायुतीचे राजेश पाटील हे गोकुळचे अध्यक्ष बनले आहेत. यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला सतेज पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय महाडिकांनी आधी आपल्या भीमा साखर कारखान्यावर एक फेरी मारुन यावं. तो कारखाना सुरुळीत चालवावा असा टोला सतेज पाटलांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले सतेज पाटील?
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे. धनंजय महाडिकांनी आधी आपल्या भीमा साखर कारखान्यावर एक फेरी मारुन यावं. तो कारखाना सुरुळीत चालवावा असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. तिथल्या कामगारांना पगार दिला जात नाही. त्या कारखान्यावर जप्ती आली ते आधी बघा असे सतेज पाटील म्हणाले. कालचा मोर्चा महायुतीच्या नेत्यांना जिव्हारी लागला आहे. काही नेते म्हणत होते मोर्चाला लोक येणार नाहीत, पण त्यांना चपराक बसली आहे. तमाम लोक अन्याय होतो म्हणून मोर्चाला आल्याचे सतेज पाटील म्हणाले.
आमचे 13 उमेदवार निवडून आलेत, आमची बाजू कोर्टात मांडू
शासन नियुक्त संचालकांची सहा महिन्यांचा अनुभव पत्र तयार केली आहेत. चेअरमन निवडी पुरती या 4 लोकांची नियुक्ती होती असे सतेज पाटील म्हणाले. चार महिन्यानंतर हे चार संचालक राहणार नाहीत, ही आतली बातमी आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवल्याचे सतेड पाटील म्हणाले. आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांबाबत असं बोलेल का? मला दादांनी इतका मोठा केला की मी 40 आमदारांचा गट तयार करून वेगळी भूमिका घेणार होतो. दादा फार जवाहरलाल नेहरु यांच्यापर्यंत पोहचले होते. पण दादा असं कायम बोलत असतात. आमचे 13 उमेदवार निवडून आले आहेत आमची कोर्टात बाजू मांडू असेही पाटील म्हणाले. मी आतापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय. मला कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही असेही पाटील म्हणाले. दादा मला मुख्यमंत्री व्हायच आहे असं म्हणाले, मला जरा बरं वाटलं असेही पाटील म्हणाले.
केवळ गोकुळची सत्ता मिळावी म्हणून 4 नागरिकांना संचालक केले
बहुमत असताना देखील सरकारने 4 संचालकांना नियुक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटवून घ्या म्हणणं आणि धनंजय महाडिक यांनी तसं काय होणार नाही म्हणणं. हे आम्हाला गाफील ठेवायचं होतं. कोरम या नियुक्तीला लागत नाही. केवळ गोकुळची सत्ता मिळावी म्हणून 4 नागरिकांना संचालक केल्याचे पाटील म्हणाले. चार मंत वेगळी ठेवण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.