🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​नवी मुंबईत थरार! दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार!

​नवी मुंबईत थरार! दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार!


मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर एक मध्ये गुरुवारी रात्री गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून किंवा प्रेम प्रकरणाच्या संशयातून दोन सख्ख्या बहिणींवर एका तरुणाने अचानक गोळीबार केला.

या हल्ल्यात दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, वैद्यकीय उपचारांनंतर सध्या दोघींचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सीता (वय 22, नाव बदलले आहे) आणि गीता (वय 20, नाव बदलले आहे) अशी जखमी झालेल्या बहिणींची नावे आहेत. हल्ल्यादरम्यान एका गोळीचा छर्रा सीताच्या कानाला चाटून गेला, तर दुसरी गोळी थेट गीताच्या पाठीत घुसल्यामुळे ती अधिक गंभीर जखमी झाली. आरोपी आणि पीडित बहिणी एकाच भागात राहत असल्यामुळे त्यांची आधीपासून ओळख होती.



या घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून परिसराची नाकाबंदी केली. पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपी अर्जुन चव्हाण याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याचा साथीदार राकेश चव्हाण हा अजूनही फरार असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. 



अटक केलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागे नक्की काय कारण होते आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे कोपरखैरणे परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.