🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँकेच्या 'सिंहासनावर' महेंद्र (आप्पा) लाड; सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात!

सांगली जिल्हा बँकेच्या 'सिंहासनावर' महेंद्र (आप्पा) लाड; सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात!


सांगली जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाचे मुख्य सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते महेंद्र (आप्पा) लाड यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे पलूस-कडेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 



​जिल्हा बँकेच्या या प्रतिष्ठेच्या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. नुकतेच त्यांच्या संचालकपदाबाबतच्या याचिकेवरील न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला होता. त्यानंतर आज पार पडलेल्या निवड प्रक्रियेत महेंद्र लाड यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. ​सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून महेंद्र (आप्पा) लाड यांची ओळख आहे. 



यापूर्वी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे, तसेच रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही ते समर्थपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या निवडीचे स्वागत करताना कार्यकर्ते व हितचिंतकांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. "लाड यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल," असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.







➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.