🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला खडेबोल! ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलकांच्या अटकेप्रकरणी १० दिवसांत मागितले उत्तर

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला खडेबोल! ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलकांच्या अटकेप्रकरणी १० दिवसांत मागितले उत्तर


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक माजी मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांना ताब्यात घेतल्याच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. 




या प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही सरकारांना आपली भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने 10 दिवसांची मुदत दिली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले.


आंदोलनादरम्यान सात हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचा आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 11 ऑक्टोबरला जंतरमंतर येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन होणार होते. मात्र, हे आंदोलन होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 



यावेळी सात हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सीजेपीचे नेते अभिजीत दिपके, विरोधी पक्षातील अनेक नेते तसेच यूट्यूबर ध्रुव राठी यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईवरून निर्माण झालेल्या वादानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

ममता बॅनर्जीसह अनेक माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतल्याचा दावा

या प्रकरणात ज्येष्ठ अधिवक्ता गुरुस्वामी यांनी याचिका दाखल केली होती. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक माजी मुख्यमंत्र्यांना अयोग्य पद्धतीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी हे आरोप फेटाळले होते. 



कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेण्यात आले नव्हते, तर निर्धारित प्रोटोकॉलनुसार त्यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून बाजूला करण्यात आले होते, अशी भूमिका पोलिसांकडून मांडण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनादरम्यान नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

SIR प्रक्रियेतील त्रुटींवरून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नाराजी

गेल्या महिन्यात देशातील विविध भागांमध्ये निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत (SIR) समोर आलेल्या त्रुटी हे या आंदोलनामागील प्रमुख कारण होते. याशिवाय, इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तातून ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

या वृत्तानुसार, SIR प्रक्रियेबाबत इतर दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी काही आक्षेप नोंदवले होते. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून एकतर्फी निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता.

विरोधकांकडून भाजपवरही टीका

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगासह आयोगाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या भाजपवरही टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी आणि काही विद्यार्थी संघटनांनी 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन आयोजित केले. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडून स्पष्टीकरण मागवले असून, पुढील 10 दिवसांत दोन्ही सरकारांना आपले सविस्तर उत्तर दाखल करावे लागणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.