मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात महागाई वाढलेली असताना आता ग्राहकांना दूध दरवाढीचा देखील मोठा झटका बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गोकुळकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासामधील सर्वात मोठी दूधदरवाढ लागू करण्यात आली आहे. गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटरमागे 6 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तर खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही गोकुळच्या इतिहासामध्ये विक्री दरात केलेली सर्वत मोठी दरवाढ आहे. यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसणार आहे, अधिक दराने दूर खरेदी करावं लागणार आहे.
गाईचं दूध देखील महागलं
दरम्यान दुसरीकडे गोकुळकडून गायीच्या दुधाच्या विक्री दरात देखील वाढ करण्यात आली आहे. गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटरमागे दोन रुपयांची तर खरेदी दरात देखील प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आज गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्तर कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांना फायदा
दरम्यान एकीकडे गोकुळने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर मागे सहा रुपयांची वाढ झाली आहे. याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे, परंतु दुसरीकडे खरेदी दरात देखील वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आल्याने ऐन दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना आता प्रति लिटरमागे तीन रुपयांची वाढ मिळणार आहे. तर गायीचं दूध विक्रेत्यांना प्रति लिटरमागे दोन रुपयांची वाढ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच गोकुळची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मोठं राजकीय नाट्य पहायला मिळालं. मात्र गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आलं, गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येताच दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.