🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक! Surf Excel ते Wheel पर्यंत सर्वच महाग; जाणून घ्या किती खिशाला बसणार झळ

ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक! Surf Excel ते Wheel पर्यंत सर्वच महाग; जाणून घ्या किती खिशाला बसणार झळ


घरगुती वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसणार आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) या कंपनीने Surf Excel, Rin आणि Wheel या लोकप्रिय डिटर्जंटच्या किमती वाढलेल्या आहेत. 




काही उत्पादनांच्या किमतीत तब्बल ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. विशेष म्हणजे, Moti Gulab साबणही महागला आहे. त्यामुळे कपडे धुण्यापासून ते रोजच्या वापरातला साबण खरेदीपर्यंत सर्वसामान्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा परिणाम

HUL ने उत्पादनांच्या किमती वाढण्यामागे कच्च्या मालाच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपनीच्या नफ्यावर दबाव निर्माण होतोय. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्यासाठी कंपनीने उत्पादनांच्या किमती वाढलेल्या आहेत. 




कंपनीच्या MD आणि CEO प्रिया नायर यांनीही इनपुट कॉस्टमधला बदल लक्षात घेऊन किमतींबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं.

Surf Excel चे नवे दर

Surf Excel Quick Wash १ किलो पॅक: ₹२३५ वरून ₹२४५

५०० ग्रॅम पॅक: ₹१२३ वरून ₹१२८

Surf Excel Easy Wash १ किलो: ₹१६७ वरून ₹१७२

५०० ग्रॅम पॅक: ₹८५ वरून ₹८७

Surf Excel २५० ग्रॅम बार: ₹४२ वरून ₹४५

Rin आणि Wheel डिटर्जंटही महागले

Rin Ala ५०० मिली: ₹९० वरून ₹९५

Rin पावडर १ किलो: ₹१२० वरून ₹१२३

Rin पावडर ५०० ग्रॅम: ₹६१ वरून ₹६३

Wheel पावडर १ किलो: ₹९० वरून ₹९३

Wheel पावडर ५०० ग्रॅम: ₹४७

Moti साबणाच्या किमतीतही वाढ

डिटर्जंटसोबतच Moti Gulab साबणाच्या किमतीतही वाढ करण्यात आलेली आहे. १५० ग्रॅम साबणाची किंमत ७४ वरून ८२ झाली. म्हणजेच ग्राहकांना आता एका साबणासाठी ८ रुपये जास्त मोजावे लागतील.




सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

दैनंदिन वापरातल्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाच्या मासिक बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांना आता डिटर्जंट आणि साबण खरेदीसाठी जास्त खर्च करावा लागेल. HUL च्या या निर्णयामुळे घरगुती वस्तूंच्या बाजारातही महागाईची झळ जाणवू लागली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.