नवसंशोधनाचा ध्यास घ्या - आ.विनय कोरे किणी हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन
किणी ,ता. २३: बहुविध दिशांच्या कल्पक विचारांनी नवा भारत निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवसंशोधनाचा ध्यास घ्यावा असे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केले. ते येथील किणी हायस्कूल , किणीमध्ये अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे भावी संशोधक निर्माण व्हावेत यासाठी किणी हायस्कूल ,किणी येथे उभारण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन आमदार कोरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी किणी हायस्कूलच्या मैदानाबाबतच्या शासकीय कामात मदत केल्याबद्दल आमदार कोरे यांचा गणेश मूर्ती देऊन किणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बालवाडी इमारतीसाठी १४ लाखांची देणगी दिल्याबद्दल श्रीमती अर्चना पाटील यांचा व विद्यालयाला सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची देणगी दिल्याबद्दल उद्योजक शरद बेनाडे यांचा आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच आयआयटीमध्ये प्रवेश पात्र ठरल्या बद्दल किणी हायस्कूलचे माजी विद्यार्थी ऋषिकेश मोहिते , अजिंक्य पाटील व ओंकार चव्हाण यांचा आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुहास माने ,राजेंद्र पाटील, सुनिल पाटील यांचे मनोगत झाले.
या कार्यक्रमासाठी किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने ,सचिव राजेंद्र पाटील, सर्व संचालक व सभासद ,जि.प. सदस्या पुष्पाताई आळतेकर, किणीचे उपसरपंच अशोक माळी, ग्रामस्थ , शिक्षक - शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक ॲड. एन.आर. पाटील यांनी केले .सूत्रसंचालन विजय कुंभार यांनी केले . मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.