मुंबई-पुण्यातील मनसेचे मेळावे रद्द..
मुंबई, 23 ऑक्टोबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मनसेनं शाखाध्यक्षांचे मेळावे रद्द केलेत. मनसेच्या ट्विटर हॅंडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मनसेचा आज मुंबईतल्या भांडूप येथे तर उद्या 24 तारखेला पुण्यात शाखाध्यक्षांचे मेळावे होणार होते. हे मेळावे अचानक रद्द करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार होते त्यामुळे मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत यांची तब्येत ठिक नसल्यानं हे मेळाव्या पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केलं आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु होणार?, शिक्षणमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं Tweet मुंबईतील भांडुप येथे शनिवारी म्हणजे आज तर रविवारी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरे हे आजारी असल्यानं हे दोन्ही मेळावे रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान येत्या काळात लवकरच हे दोन्ही मेळाव्याचं पुन्हा आयोजन केलं जाणार असल्याचं मनसेनं जाहीर केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.