महापालिकेच्या कृष्णामाई जत्रेसाठी तिसऱ्या दिवशी समर्थ घाट फुलला: दीपोत्सव, लावणी, कराटे , मशाल डान्स आणि उखाणे स्पर्धानी घाटाच्या जत्रेला आला बहर: आज जत्रेचा समारोप
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कृष्णामाई जत्रेसाठी तिसऱ्या दिवशी समर्थ घाट सांगलीकर जनतेनेच्या गर्दीने फुलुन निघाला. तिसऱ्या दिवशी दीपोत्सव, लावणी, कराटे शो , पाण्यातील मशाल डान्स आणि उखाणे स्पर्धानी समर्थ घाटाला जत्रेला बहर आहे. आज रविवारी जत्रेचा समारोप आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस जनतेने उत्साही प्रतिसाद दिला आहे.
21 एप्रिल रोजी कृष्णामाईच्या जत्रेला समर्थ घाटावर सुरवात झाली. यानंतर तीन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. तीन दिवसात चला हवा येऊ द्या चे कलाकार तसेच उत्सव नात्याचा या कार्यक्रमाचे सर्व कलाकार यांनीही कृष्णमाईच्या जत्रेला हजेरी लावली होती. तिसऱ्या दिवशी कराटे शो , नेत्रदीपक दीपोत्सव,
लेसर शो याचबरोबर नंदा, पूजा, धनश्री निर्मला वाईकर यांच्या पथकाचा लावण्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. याचबरोबर उखाणे स्पर्धाही संपन्न झाल्या. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे आणि टीमने या कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमास पोलीस उपअधिक्षक अजित टिके, मिरजेचे उपअधीक्षक अशोक वीरकर, स्थायी सभापती निरंजन आवटी सहकुटुंब उपस्थित होते. आज रविवारी विविध कार्यक्रम होणार असून दुपारी 3 वाजता पोहण्याच्या स्पर्धा होणार आहेत. याचबरोबर कृष्णामाई जत्रेचा समारोप होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)