Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिकेकडून सोमवारपासून राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम : दि. २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ मोहीम: नागरिकांनी लाभ घेणेचे आवाहन

महानगरपालिकेकडून सोमवारपासून राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम :  दि. २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ मोहीम: नागरिकांनी लाभ घेणेचे आवाहन



सांगली :-  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सोमवार पासून महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवार दि. २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ या दरम्यान जंतनाशक मोहीम हाती घेण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घेणेचे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

१ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ % बालकांमध्ये आढळणारा आतडांच्या कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणा-या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. तसेच बालकाची शारिरीक बौध्दिक वाढ खुटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन १ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील विदयार्थी (शाळेतील व शाळाबाहय) यांना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. पोषणस्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचा उददेश आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम दि. २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ या आठवडयामध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशकाची गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. आरोग्य शिक्षण, एकात्मिक बाल विकास विभाग या ३ मुख्य विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे.

 संस्थास्तरावर शाळा/महाविदयालय मधील ०६ वर्षे ते १९ वर्षांच्या मुलांना शिक्षकांमार्फत दि. २५ एप्रिल २०२२ राष्ट्रीय ते जंतनाशक दिन व दि.२९ एप्रिल २०२२ मॉप-अप दिन रोजी जंतनाशक गोळया खायला देण्यात येणार आहे.

समुदाय स्तरावर आशा / अंगणवाडी सेविका/यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघर जाऊन शाळेत न जाणा-या १ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुलांमुलींना दि. २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ या आठवडयामध्ये जंतनाशक गोळया खायला देण्यात येणार आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील एकुण १२६९९४ मुले व मुलींना जंतनाशक गोळया देण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींनी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.