Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रवणबेळगोळ तिर्थक्षेत्र विकासा अंतर्गत नवीन भोजनालय व अद्यावत ऑडिटोरियम च्या निर्मितीची सुरुवात - सुरेश पाटील

श्रवणबेळगोळ तिर्थक्षेत्र विकासा अंतर्गत नवीन भोजनालय व अद्यावत ऑडिटोरियम च्या निर्मितीची सुरुवात -  सुरेश पाटील


श्रवणबेळगोळ तिर्थक्षेत्र विकासा अंतर्गत नवीन भोजनालय व अद्यावत ऑडिटोरियम च्या निर्मितीची सुरुवात -  सुरेश पाटील सांगली - श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र विकासासाठी कर्नाटक शासनाने मंजूर केलेल्या ५० कोटी निधीपैकी सुरुवातीच्या टप्प्यात २० कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ झाला असून, त्यामध्ये  २५००० स्के. फुटाचे नवीन भोजनालय बांधकाम निर्मितीसाठी सात कोटी व ७५० लोकांची आसन क्षमता असलेले आणि ४० हजार स्के. फुटाचे अद्यावत ऑडिटोरियम बांधकाम निर्मितीसाठी नऊ कोटी ची कामे  शीघ्रगतीने सुरू झाली आहेत . श्रवणबेळगोळ दौऱ्या प्रसंगी  श्रवणबेळगोळ ट्रस्ट समितीचे विश्वस्त तथा प्रकल्प व्यवस्थापन समिती संयोजक सुरेश पाटील यांनी सुरू असलेल्या विकासकामांची काल पाहणी करून सदरची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापन समिती सदस्य विनोद दोडन्नावर , जी. डी. पार्श्वनाथ आदी मान्यवर उपस्थित होते .


यावेळी सुरेश पाटील म्हणाले ,  श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र विकासासाठी कर्नाटक शासनाने मंजूर केलेल्या ५० कोटी निधीपैकी यावर्षी २० कोटी रुपयांची विकासकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून , मंजूर निधीतून श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्राचे पुरातत्व विभागाचा  जीर्णीद्वार ,नवीन आरक्षण कार्यालय पूर्णत्वास नेणे  ,नवीन भोजनालय बांधणे , इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभे करणे , हेरिटेज  परिसरात  रस्ते दुरुस्त करणे, त्याचप्रमाणे येथील २ हजार खोल्यांची दुरुस्ती करणे , कार्यालयाचे आधुनिकीकरण करणे  ,ऑनलाईन बुकिंग यंत्रणा राबविणे आदींचा समावेश आहे. ते म्हणाले कर्नाटक शासनाने संपूर्ण देश विदेशामध्ये प्रसिद्ध असलेला श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र विकासासाठी उचललेले हे स्वागताहर्य आणि उत्साहदायी पाऊल आहे  .याबद्दल जैन धर्मियामध्ये समाधान व्यक्त  होत आहे .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.