स्कॅर्पिओवर अंबर दिवा लावून स.दु.नि.चा कारवाईचा फार्स प्रकरण मिटवण्यासाठी मागितले दहा लाख, खासगी लोकांना घेऊन केला कारनामा
सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील संशयित पलायन प्रकरणाचा पडद्यामागचा खरा सूत्रधार असलेला तो सदुनि इस्लामपूर परिसरात स्वतःच्या खासगी स्कॅपिर्ओवर अंबर दिवा लावून रूबाब मारत असल्याची चर्चा. येलूर फाट्यावर गोवा बनावटीच्या दारूवर करण्यात आलेल्या कारवाईवेळीही तो गाडीवर अंबर दिवा लावून गेल्याचे प्रत्यक्षदशीर्नी सांगितले आहे. शिवाय हा कारवाईचा फासर् त्याने खासगी लोकांना (झिरो) सोबत घेऊन केल्याचेही समजते.
वास्तविक गोवा बनावटीची दारू घेऊन आलेला कंटेनर येलूर फाट्यावरील एका पेट्रोल पंप परिसरात थांबला होता. रविवारी सकाळी सातच्या सुमारास हा सदुनि अंबर दिवा लावलेली गाडी घेऊन सोबत दोन झिरोंना घेऊन तेथे गेला. त्यानंतर त्याने एका संशयिताला प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाखांची आफर दिली. त्यावेळी त्या संशयिताने पैशांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. पण त्याच्याकडून पैशांची जुळणी झाली नाही. त्यानंतर या सदुनिने त्यांना अखेरची सहा लाख रूपयांची ऑफर दिली. मात्र संशयिताने त्याला नकार दिला.
या कारवाईदरम्यान त्याच्यासोबत असलेल्या लोकांबाबत चौकशी केल्यानंतर ती खात्याची माणसे आहेत. एवढेच तो सांगत होता. प्रत्यक्षात मात्र ते खासगी लोक (झिरो) होते असे काहींचे म्हणणे आहे. संशयिताकडून पैशांची मागणी पुरी होत नसल्याचे पाहून त्याने दुपारी त्याला इस्लामपूर येथे नेले. आणि नंतर कारवाईचा फार्स सुरू केल्याचीही एक्साईजमध्ये चर्चा.
या सदुनिने संशयिताकडे दहा लाखांची मागणी केली. त्यावेळी त्याने संशयिताला यातील हिस्सा वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही द्यावा लागतो असे सांगितले. त्यामुळे सदुनिच्या या कारवाईत सांगलीतील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे का ? याचीही चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
