पक्षआदेश डावलून स्थायी समिती मध्ये भाजपचे सभापतींच्या कडूनच झालेल्या जनहितविरोधी घनकचरा निवीदा ठरावाच्या निषेधार्थ २५ एप्रिल ला सोमवारी मौनव्रत
भारतीय जनता पार्टी चां पक्षआदेश डावलून भाजपच्या च स्थायी समिती सभापती यांनी जनहितविरोधी चुकीच्या शर्थी अटी सह घनकचरा निवीदा मंजुरीचा ठराव केला आहे. मागे हीच तोट्याची असलेली घनकचरा निवीदा भाजप ने स्थायी सभेत रद्द केली होती..तरी सुध्दा पक्षाचा आदेश, भुमिका डावलून भाजपच्याच आताचे स्थायी सभापतीं यांनी एनवेळचा ठराव आणून काॅग्रेस, राष्ष्टवादी च्या साथीने सदर जनहित विरोधी घनकचरा निविदा ठराव मंजूर केली आहे .
याला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपक बाबा शिंदे ,आ. सुधीर दादा गाडगीळ,आ. सुरेश भाऊ खाडे , पश्र्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप प्रदेश सदस्य शेखरजी इनामदार तसेच सर्वच प्रमुख नेत्यांनी आयुक्तांना पत्र देऊन विरोध करुन ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे. सदर सर्व प्रकारामुळे भारतीय जनता पार्टी ची जनतेमध्ये मोठी बदनामी होत आहे ' अगोदर तोट्याची असलेली घनकचरा प्रकल्प निविदा आता फायद्याची कशी झाली' यात भष्टाचार झाला आहे का? असे अनेक प्रश्र्न नागरिकांच्या कडुन विचारली जात आहेत. त्या प्रश्ना पुढे भाजप कार्यकर्त्यांना निरुत्तर व्हावे लागत आहे. त्याचा सांगली शहर जिल्हा मधील भाजपच्या कट्टर व एकनिष्ठ निस्वार्थी पणे अहोरात्र पक्षासाठी काम करत असलेत्या सर्व कार्यकर्ते यांना वाईट वाटत आहे. तरी यामध्ये भाजपची जनतेमध्ये होत बदनामी, फिल्डवर पक्षासाठी काम करत असलेने जनतेच्या प्रश्नांफुढे आम्हाला निरुत्तर व्हावे लागत आहे..
तरी या सर्व प्रकारच्या निषेधार्थ व भाजपच्या स्थायी सभापती व सर्व भाजप स्थायी सदस्यांनी ठरावाच्या विरोधी पत्रे देऊन रद्द करणेचे मागणी साठी सोमवारी दिनांक २५ एप्रिल सोमवारी रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय स्फुती चौक सांगली येथे सकाळी ११ पासुन एकदिवसीय मौन व्रत आंदोलन करीत आहे.
मौन व्रत आंदोलन
दिनांक -२५-४-२०२२
वार. - सोमवार
वेळ- सकाळी ११ वाजता
ठिकाण- भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय , गव्हमेंट काॅलनी स्फुती चौक , सांगली .
आपला
दिपक माने
संघटन सरचिटणीस
भारतीय जनता पार्टी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
