Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर 'त्या' किर्तनकार बाबावर गुन्हा दाखल

 अखेर 'त्या' किर्तनकार बाबावर गुन्हा दाखल


औरंगाबाद : समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबतची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या महाराजासह महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय 48, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

साधारण चार दिवसांपूर्वी बाळकृष्ण माेगल याच्यासोबत समव्यावसायिक 40 वर्षीय महिलेची अश्लील चित्रफीत गंगापूर, वैजापूर तालुक्यात व्हायरल झाली होती. संबंधित चित्रफीत काही क्षणातच सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कारण संबंधित चित्रफितीत बाळकृष्ण मोगल आणि समव्यावसायिक महिला नको त्या अवस्थेत दिसून येत होती.एका हॉटेलमध्ये विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे पुढे येत आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून, ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून बाळकृष्ण मोगल याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.