मिरज विधानसभा मतदार संघाची समस्यामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
मिरज विधानसभा मतदार संघाची समस्यामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शहरातील बऱयाच वर्षांपासून प्रलंबित अनेक कामे मार्गी लागली असून, ग्रामीण भागात बहुतांशी गांवे समस्यामुक्त झाली आहेत. आज शुक्रवारी भाजपानेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मतदार संघातील अनेक विकास कामांचा शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्तीही होत आहे.
आज मिरज विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची तोफ खणाणणार आहे. निमित्त आहे, मतदार संघातील 112 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा. महापालिका निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच मतदार संघ दौऱयावर आहेत. त्यामुळे ते काय बोलणार? सत्ताधारी महाविकास आघाडीचा कसा समाचार घेणार? याकडे राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे या उद्घाटन समारंभ आणि मेळाव्याला विशेष महत्त्व प्राफ्त झाले आहे. याशिवाय यानिमित्ताने आमदार सुरेश खाडे यांच्या आश्वासनांचीही वचनपूर्ती होणार आहे.
112 कोटींच्या कामांचा शुभारंभ
भाजपा नेते फडणवीस आणि दानवे-पाटील यांच्या दौऱयाच्या निमित्ताने मतदार संघातील 112 कोटी, सात लाख रुपयांच्या विकास कामांचाही शुभारंभ होणार आहे. त्यामध्ये 15 कोटी, 93 लाख रुपये खर्चाची कवलापूर पाणी पुरवठा योजना, 35 कोटी, 19 लाख रुपये खर्चाच्या कृष्णाघाट रेल्वे उड्डाणपूल, 15 कोटी 74 लाख रुपयांच्या सुभाषनगर आणि 17 कोटी 53 लाख रुपयांच्या बेडग स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा शुभारंभ होणार आहे. याशिवाय चार कोटी, 75 लाख रुपये खर्चाच्या ढवळी गावाजवळील लहान पूल, मालगांव येथील सिध्देश्वर मठ सुशोभीकरणासाठी चार कोटी, 50 लाख, टाकळी येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी तीन कोटी, आठ लाख, चाबुकस्वारवाडी-सलगरे-डोंगरवाडी-शिपूर-आरग रस्त्यासाठी चार कोटी, आरग-नरवाड रस्त्यासाठी चार कोटी, सोनी गावाजवळील लहान पुलासाठी दोन कोटी, 75 लाख, कवलापूर गांव तलाव सुशोभीकरणासाठी दोन कोटी, 50 लाख आणि बेडग मरगाई मंदिर सुशोभीकरणासाठी दोन कोटी, 50 लाख अशा 112 कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे.
26 कोटींची कामे प्रगतीपथावर
मतदार संघात आमदार फंडातून सात कोटी, 81 लाख, 57 हजार, जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटी, 37 लाख, तिर्थक्षेत्र आणि जनसुविधेसाठी 75 लाख, 25ः15 योजनेतून एक कोटी, 75 लाख, दलित वस्तीसाठी एक कोटी, केंद्रीय रस्ते निधीतून सात कोटी, 93 लाख, 43 हजार, नाबार्डमधून तीन कोटी, 41 लाख अशा विविध मार्गातून 25 कोटी, 78 लाख रुपयांचा निधी मतदार संघात मंजूर झाला आहे. या सर्व कामांची उद्घाटने झाली असून, ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यामध्ये मतदार संघाच्या ग्रामीण भागातील अनेक कामांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत 2515 कोटींची कामे
मिरज विधानसभा मतदार संघात विविध योजनेंतर्गत आणि आमदार फंडातून सुमारे 2515 कोटी, 43 लाख, 27 हजार रुपयांच्या कामांना मान्यता मिळून ती पूर्ण झाली आहेत. या निधीतून शहर आणि ग्रामीण भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागली आहेत. या निधीमध्ये 25ः15, दलित वस्ती, जिल्हा वार्षिक नियोजन, नाबार्ड, अर्थसंकल्पीय तरतूद, जनसुविधा योजना, तिर्थक्षेत्र योजना, नागरी सुविधा योजना, विशेष निधी, अल्पसंख्यांक निधी, कोरडवाहू योजना, जलयुक्त शिवार, आमदार फंड, शहरातील अंबाबाई& नवरात्र संगीत महोत्सव, नगरोत्थान निधी, तालुका क्रीडा संकुल, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिजतन, प्रादेशिक पर्यटन विकास, जिल्हास्तरीय पर्यटन, बोलवाड येथील जैवविविधता उद्यान, दंडोबा विकास निधी, आरग प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री अपघाती मृत्यू, विद्यार्थी अपघात अनुदान, सीआरएफ, शासकीय तंत्रनिकेत इमारत, मुलींचे वसतीगृह, शासकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, कवलापूर दलित वस्ती विकास, अमृत योजना, सुधारीत योजना, नगरविकास योजना, शिवाजी रस्ता, रेल्वे उड्डाणपूल, खटाव येथील कॅनॉल, मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, गुणवंत मुलांचे वसतीगृह, महापालिकेसाठी विशेष निधी, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग, कुमठे फाटा ते म्हैसाळ राज्य हद्द रस्ता, सांगली-मिरज रस्ता, मुख्यमंत्री पेयजल, प्रादेशिक पर्यटन, पंचायत समिती इमारत, प्रमुख जिल्हा मार्ग अशा 2515 कोटी, 43 लाख, 27 हजार रुपयांच्य अनेक विकास कामांचा समावेश आहे.
भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा
विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आज शुक्रवारी मिरज विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय जिह्याचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी मकरंद देशपांडे, विलासराव जगताप, राजेंद्रआण्णा देशमुख, दिनकर पाटील, सदाभाउढ खोत, नितीनराजे शिंदे, सौ. निताताई केळकर, शेखर इनामदार, प्रा. मोहन वनखंडे, संग्राम देशमुख, सौ. प्राजक्ता कोरे, सत्यजित देशमुख, पै. पृथ्वीराज पवार, विवेक कांबळे, निशिकांत पाटील, राजाराम गरुड, राहूल महाडीक हे भाजपाचे नेते मेळाव्यास हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मिरज-मालगांव रोडवरील सुभाषनगर हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ होणाऱया उद्घाटन समारंभ आणि भाजपा कार्यकर्ता मेळाव्याकडे जिह्याचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
