Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जलसंपदातील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून ७० तोळे दागिने चोरीस ; औंध परिसरातील घटना

  जलसंपदातील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून ७० तोळे दागिने चोरीस ; औंध परिसरातील घटना



पुणे :  जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी ७० तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ओैंधमधील एका सोसायटीत ही घटना घडली. रवींद्र रामचंद्र कांबळे (वय ६१, रा. पिनाका गंगोत्री सोसायटी, नागरस रस्ता, औंध) यांनी या संदर्भात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे जलसंपदा विभागातून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. कांबळे आणि त्यांची पत्नी ३ जुलै रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी कागल येथे गेले होते. कांबळे यांच्या सदनिकेचा दरवाजा चोरट्यांनी उचकटला. कांबळे यांचा लहान मुलगा इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. त्याला भेटण्यासाठी मोठा मुलगा इंग्लडला गेला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.