Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन

अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन


सांगली, दि. २० :  अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, शालेय साहित्य, हॉस्पिटल यावर केंद्रातील मोदी सरकारने पाच टक्के जीएसटी आकारून लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्याला विरोध करण्यासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज येथील झाशी चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केले.

श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, मोदी सरकारने दूध, दही, लस्सी, ताक, पनीर, आटा, डाळी, तांदूळ, गूळ, गहू, बाजरी आणि ज्वारी या खाद्य पदार्थांवर 5% जीएसटी लागू केला आहे. देशाच्या इतिहासात अशा पद्धतीचा जीवनावश्यक वस्तूंवर पहिल्यांदाच मोठा कर लादला गेला आहे. हा कर म्हणजे गब्बर सिंग कर आणि जिझीया करच म्हणावा लागेल.

ते म्हणाले, हॉस्पिटलच्या रूम चार्जेसवर 5% जीएसटी द्यावा लागणार आहे, तसेच हॉटेलात रूम चार्जेसवर 12% जीएसटी वसूल केला जाणार आहे. ब्लेड, पेपर, कैची, पेन्सिल, शार्पनर अशा शैक्षणिक साहित्यावर 18% GST वसूल होणार आहे. आधीच पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस याच्या किमती भरमसाठ वाढवून लोकांचे कंबरडे मोडले आहे, आणि अशातच आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून मोदी सरकारने लोकांचे जगणेच  मुश्किल करून सोडले आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा कर रद्द करेपर्यंत आंदोलन छेडणार आहे.

श्री विशाल पाटील म्हणाले, मोदी सरकारच्या काळात आधीच गरिबीचे दिवस आले आहेत, आणि त्यातच हा कर लादून आणखी गरिबी लादली जात आहे. लोकांच्या संयमाची परीक्षाच मोदी सरकार पाहत आहे.

आंदोलनात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. "मोदी सरकारला आले झटके, लोकांच्या पोटाला दिले चिमटे," "शालेय साहित्य महागलं, मुलांनी शिकायचं सोडलं," "वाह रे मोदी सरकार, लोकांचे जगणे केले बेजार, "कडधान्ये, दही - दुधावर जीएसटी, स्वयंपाकाला द्या म्हणे सुट्टी अशा घोषणा लिहिलेले फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. 

यावेळी विरोधी पक्ष नेते संजय मेंढे, देवानंद जमगी, सुवर्णा पाटील, नगरसेवक मनोज सरगर, फिरोज पठाण, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, रविंद्र वळवडे, अमर निंबाळकर, अल्ताफ पेंढारी, प्रमोद सुर्यवंशी, शितल सदलगे, कय्युम पटवेगार,  रहिम हट्टीवले, अजित दोरकर, आयुब निशानदार, अमित पारेकर, संतोष भोसले, योगेश राणे, प्रशांत अहिवळे, वसिम अमिन, मौलाली वंटमुरे, सचिन घेवारे, विजय आवळे, माणिक कोलप, सुर्यकांत लोंढे, महावीर पाटील, शुभम बनसोडे, सागर काळे, श्रीधर बारटक्के, भरत बोतरा, याकुब मणेर, महेश शिंदे, मोईन जमादार, सचिन चव्हाण, निलेश पाटील, प्रशांत देशमुख,  अशोकसिंग रजपूत, शरद सावंत, सिमा कुलकर्णी, मुजावर मॅडम, अख्तर अत्तार, अनिकेत गायकवाड, सुभाष पट्टणशेट्टी, नेताजी खोत, सिध्दार्थ कुदळे, शंकर माने, अमित बस्तवाडे, अरूण पळसुले, मनिष साळुंखे आदि सहभागी होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.