Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत करणारे देशद्रोही',आदित्य ठाकरे यांची टीका

'भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत करणारे देशद्रोही',आदित्य ठाकरे यांची टीका


मुंबई : माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं मंगळवारी मुंबईत आगमन झालं.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.मुंबई विमानतळावर कोश्यारी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
तर दुसरीकडे भगत सिंह कोश्यारी यांच्या स्वागतावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.’ जे महाराष्ट्राचा अपमान करू पाहतात त्यांनी भगत सिंह कोश्यारी यांचं स्वागत केलं आहे. ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे त्यांनी भगत सिंह कोश्यारी यांचं स्वागत केलेलं आहे. ज्याने महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांचा अपमान केला तो खरोखरच देशद्रोही आहे’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे मंगळवारी वरळीतील कोळीवाड्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. यादरम्यान त्यांनी अकोल्यातील दंगलीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर केली निशाणा साधला आहे. ‘गेल्या काही महिन्यांपासून राज्यात दंगली वाढत आहेत, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कधीही दंगल झाली नाही.शिंदे-भाजप सरकारच्या काळात दंगली होत आहेत,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.