मुंबई : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए), मुंबई येथे तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील मिरजेतील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेची त्याने ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. गौरव आवळे (वय 31, रा. मिरज, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. आवळे 2019 मध्ये तिला भेटला त्यावेळी त्याने स्वत:ची ओळख केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागातील अधिकारी म्हणून सांगितली आणि तिच्याशी चांगली मैत्री केली. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलशी लग्न करण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेवर जुलै 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात बलात्कार केला.
आवळे याने महिलेकडून विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. आवळे यांनी तिला पोलिसांच्या पतसंस्थेकडून कर्ज घेण्यास भाग पाडले आणि काही मित्र आणि नातेवाईकांकडून तिच्या नावावर पैसे घेतले, असे तक्रारीत म्हंटले आहे.आवळे याने तिच्या बचतीतून पैसे काढून गुंतवणुक करण्याचे आमिष दिले. तिच्याकडून 13 तोळे सोनेही घेतले. त्याचा आपल्याशी लग्न करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर तिने पैसे परत करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. आवळे तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. शेवटी, जेव्हा महिलेने त्याच्यावर दबाव आणला तेव्हा त्याने तिला पैसे परत करण्यास नकार दिला आणि परतफेड करण्यास भाग पाडल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर महिलेने काही आठवड्यांपूर्वी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. झोनल डीसीपीनी त्याचा आढावा घेऊन या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.