Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लचखोर कृषी मंडळ अधिकारी अटक : लाच लुचपतची कारवाई

लचखोर कृषी मंडळ अधिकारी अटक : लाच लुचपतची कारवाई 

विभागाच्या एका योजने अंतर्गत शेतातील संत्राबागेच्या पुनरुज्जीवनाकरिता मिळणार्‍या अनुदानासाठी शेतकर्‍याने अर्ज केला असता सदर योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकत नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देतो, याकरिता अनुदानापैकी 50 टक्के रक्कम मला द्यावी लागेल अशी अट घालून तडजोडी अंती 13 हजाराची लाच स्वीकारणारा मोर्शीचा कृषी मंडळ अधिकारी पांडुरंग नामदेव मस्के याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

यातील तक्रारदाराने 20 मार्च रोजी तक्रार दिली. त्यांनी कृषी विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत शेतातील संत्रा बागेचे पुनरुज्जीवर करण्याकरिता मिळणार्‍या अनुदानासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवरून नोव्हेंबर 2023 मध्ये अर्ज सादर केला होता. त्यानंतर त्या संबंधाने तक्रारदार हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मोर्शी येथील मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के यांना भेटले असता त्यांनी सदर योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकत नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देतो, योजनेचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तुम्हाला मिळणार्‍या अनुदानापैकी 50 टक्के रक्कम मला मोबदला म्हणून द्यावी लागेल, अशी अट घातली.

तक्रारीच्या अनुषंगाने 21 मार्च रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के यांनी तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या अनुदानापैकी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 13 हजार रु. लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. यावरून 21 मार्च रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग नामदेव मस्के यांनी लाचेची रक्कम 13 हजार रु. पंचासमक्ष स्वीकारली. त्यामुळे पांडुरंग मस्के यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुध्द पो.स्टे. मोर्शी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक अनिल पवार, उप अधीक्षक मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. योगेशकुमार ददे, पो. नि. शिल्पा भरडे, पो.कॉ. आशिष जांभोळे, पो.कॉ. शैलेश कडू, पो.कॉ. उपेंद्र थोरात, चालक किटुकले यांनी पार पाडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.