Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मान काळवंडून घाण झाली, करा घरगुती उपाय होईल पांढरीशुभ्र

मान काळवंडून घाण झाली, करा घरगुती उपाय होईल पांढरीशुभ्र 


उन्हाळ्यामध्ये सतत घाम आल्यानंतर मान आणि त्वचेवर घाम साचून राहिल्याने त्वचा काळपट होते. मानेवरील काळपटपणा वाढल्यानंतर महिलांना बाहेर फिरताना लाजिरवण्यासारखे वाटते.त्यामुळे उन्हाळ्यात तुमची देखील मान काळी झाली असेल तर घरगुती उपाय नक्की करून पाहा. उन्हाळामध्ये जास्त घाम आल्यानंतर त्वचेवर घाण साचून राहते. जास्त घामामुळे त्वचेवर खाज किंवा पुरळ येण्यास सुरुवात होते. तसेच मानेवरील त्वचा काळी पडू लागते. त्यामध्ये मान, हाताचा कोपरा, पायावरील घोटा काळवंडलेला दिसू लागतो. 
पण अनेकजण चेहरा सुंदर करण्याच्या नांदत मानेकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मानेवरील त्वचा अधिक काळी पडते. माती, धूळ, घाम यामुळे मान आणि हातांच्या कोपऱ्यांमध्ये घाण साचून राहते.यामुळे त्वचा तेलकट होते. सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला महागड्या क्रीम किंवा इतर ब्युटी प्रॉडक्ट वापरता पण त्याच्यामुळे फक्त चेहरा सुंदर दिसतो आणि मान काळीच दिसते. मानेवरील काही भाग काळा झाल्यानंतर बाहेर फिरताना देखील लाजिरवण्यासारखं वाटत. पण मानेवरील काळेपणा नेमका घालवायचा कसा? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असे तर आम्ही आज काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्याने तुमच्या मानेचा रंग सुधारून त्वचा मऊ होईल.चला तर जाणून घेऊया मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय.


मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय:

बेकिंग सोडा, लिंबू:

मानेवरील काळपट घालवण्यासाठी एका वाटीमध्ये सफेद रंगाची कोलगेट, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर मानेवरील काळ्या पडलेल्या त्वचेवर लावा. १० ते १५ मिनिटं सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे मानेवरील काळपटपणा कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल. लिंबाच्या रसामध्ये असेल्या व्हिटॅमिन सी असल्याने मानेवरील काळपटपणा कमी होण्यास मदत होते.

बेसन आणि हळद:

हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवरील काळपटपणा कमी होण्यास मदत होईल. यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकून गुलाब पाणी किंवा कच्च्या दुधात मिक्स करा. जाडसर पेस्ट बनवून झाल्यानंतर ती मानेवर लावा. मानेवर लावल्यानंतर १० ते १५ मिनिटं ठेवून मान स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे काळपटपणा कमी होऊन मन उजळून दिसेल. हा घरगुती उपाय रोज केला तर फरक दिसून येईल.

40 व्या वर्षीही दिसाल अधिक तरूण, व्हायरल कोरियन फेस मास्कमुळे पडेल सौंदर्यात भर
ॲपल सायडर व्हिनेगर:

ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर त्वचेवरील पीएच पातळी संतुलित करण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले मेलिक ॲसिड त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत करतात. ३ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर ४ चमचे पाण्यात मिक्स करून मानेवर लावा. १५ मिनिटं झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय सतत केल्याने हळूहळू त्वचेवरील काळेपणा कमी होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.