Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातलं अनोखे गाव :, प्रत्येक घरात IPS किंव्हा IAS अधिकारी जन्माला येतो

भारतातलं अनोखे गाव :, प्रत्येक घरात IPS किंव्हा IAS अधिकारी जन्माला येतो 


IAS आणि IPS अधिकारी बनण्याचं कित्येक तरुणांचं स्वप्न असतं. देशभरातील लाखो तरुण दरवर्षी युपीएससीची परीक्षा देतात. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावं, IPS किंवा IAS अधिकारी होऊन देशाची सेवा करावी, अशी देशभरातील तरुणांची इच्छा असते.

पण ही परीक्षा फार कठीण असते. या परीक्षेचा निकालही तसाच लागतो. त्यामुळे एक-एक गुणासाठी विद्यार्थ्यांचं स्वप्न अपूर्ण राहून जातं. अनेक तरुण आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी खर्च करतात. यापैकी अनेकांना यश मिळतं. तर काही जण वारंवार प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने दुसऱ्या क्षेत्रात जावून करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात. IPS आणि IAS अधिकारी बनणं किती कठीण असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आम्ही आपल्याला देशातील अशा एका खेडेगावाची माहिती देणार आहोत ज्या गावातील प्रत्येक घरात एक IPS किंवा IAS अधिकारी जन्माला आला आहे.


उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील माधोपट्टी गाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात केवळ IPS आणि IAS अधिकारीच जन्माला येतात, असं बोललं जातं. 75 घरांची वस्ती असलेल्या गावात तब्बल 47 IAS अधिकारी आहेत, जे उत्तर प्रदेशासह देशभरातील विविध राज्यांमध्ये आपली सेवा देत आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या गावातील अनेक नागरीक हे प्रशासकीय सेवेसाठी जायचे. जौनपूर जिल्ह्यापासून हे गावल 11 किमी अंतरावर आहे. या गावातील प्रत्येक घरात एक IPS किंवा IAS अधिकारी आहे. विशेष म्हणजे फक्त प्रशासकीय सेवाच नाही तर या गावातील तरुण चक्क भाभा अॅटोमिक सेंटर, इस्त्रो सारख्या नामांकीत संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. याशिवाय इंटरनॅशनल बँकामंध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

सणासुधीला प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या रंगाच्या दिव्यांच्या गाड्या

माधोपट्टी गावात प्रत्येत सणासुधीला प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या रंगाच्या दिव्यांच्या गाड्या बघायला मिळतात. या गावाची लोकसंख्या जवळपास 800 इतकी आहे. ज्यामध्ये सर्वाधिक संख्या ही राजपूत समाजाची आहे. माधोपट्टी गावाची आणखी एक विशेषत: म्हणजे या गावात एकही कोचिंग क्लास नाही. तरीही इथे विद्यार्थी यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचताना दिसत आहेत. इथे शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या दृष्टीकोनाने शिक्षण दिलं जातं.

एकाच कुटुंबात पाच IAS अधिकारी
माधोपट्टी गावात एका कुटुंबाने चांगलाच रेकॉर्ड केला आहे. या कुटुंबातील चार भावंडांनी IAS ची परीक्षा पास केली आहे. या कुटुंबातील मोठा मुलगा विनय सिंह यांनी 1955 मध्ये यूपीएससीची परीक्षा पास केली होती. विनय सिंह निवृत्तीच्या वेळी बिहारचे मुख्य सचिव होते. त्यांचे भाऊ छत्रपाल सिंह आणि अजयकुमार सिंह 1964 मध्ये IAS बनले होते. त्यानंतर त्यांचे छोटे बंधू शशिकांत सिंह 1968 मध्ये यूपीएससी परीक्षा पास झाले होते. विशेष म्हणजे याच कुटुंबाची पुढची पिढी म्हणजेच शशिकांत सिंह यांचे चिरंजीव यशस्वी हे 2002 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यशस्वी हे 31 व्या रँकने उत्तीर्ण होत IAS बनले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.