अनैतिक संबंधाला कंटाळली, पत्नीने पतीच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा; दीड महिन्यांनी उलगडले हत्येचे रहस्य
गोंडा : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. प्रेयसीने पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीने आधी प्रियकराला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियकराची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. हत्येनंतर आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, पोलिसांना दीड महिन्यानंतर हत्येचे रहस्य उलगडले.
गोंडा येथील इटियाथोक कोतवाली क्षेत्रात ही घटना घडली आहे. पती-पत्नीने दीड महिन्यापूर्वी शकील अहमदची हत्या केली. शकील अहमदचा मृतदेह १८ जानेवारी रोजी पेराड नाल्याजवळ आढळला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टमध्ये शकील अहमदची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी हत्येचे प्रकरण उलगडण्यासाठी ५ पथके नेमली होती.
मृतक शकील अहमदच्या पत्नीने पोलिसांत गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस तपासात हत्या करणाऱ्या पती-पत्नीला अटक केली. अनैतिक संबंधाला कंटाळून मोहम्मद शकीलची हत्या केल्याचे उघड झाले. गेल्या दोन वर्षांपासून शकील अहमद आणि शबीनाचे प्रेमसंबंध होते. मात्र, शबीनाचं लग्न वकील अहमदसोबत झालं. त्यानंतर वकील अहमदने पत्नीला शकीलला भेटीवर निर्बंध लादले होते. शबीनानेही मान्य केलं. तरीही शकील शबीनाला भेटण्याचा प्रयत्न करायचा. तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा.
नेमकं काय घडलं?
धमक्यांना वैतागून पती-पत्नीने शकीलची हत्या करण्याचं ठरवलं. शबीनाने शकीलला फोन करून घरी बोलावून घेतलं. त्यानंतर दोघांनी त्याचा गळा आवळून हत्या केली. पुढे त्याचा मृतदेह नाल्यात फेकला. हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिसांना दीड महिन्यानंतर हत्येचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.