डिलिव्हरीनंतर तासाभरात अडीच कोटींची फेरारी कार जळून खाक, 10 वर्षांतील पैशांच्या बचतीची राखरांगोळी
जपानमध्ये एका व्यक्तीने आवडती फेरारी कार खरेदी करण्यासाठी 10 वर्षे पैशांची बचत केली. या बचतीमधून साठवलेले पैसे घेऊन फेरारी कारचे शोरूम गाठले. आवडती फेरारी कार खरेदी केली, परंतु अवघ्या तासाभरात ही कार जळून खाक झाल्याने या व्यक्तीच्या स्वप्नांची जणू राखरांगोळी झालीय. ही घटना जपानमध्ये घडली आहे. संगीत निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या होनका@नने जवळपास 10 वर्षांपासून पैशांची बचत करत 43 दशलक्ष जपानी येन म्हणजेच जवळपास 2.5 कोटी रुपये जमवले होते. हे पैसे जमवल्यानंतर त्याने फेरारी 458 ही स्पायडर कार खरेदी केली.
होनका@न याने 16 एप्रिलला कारची डिलिव्हरी घेतली. दीडच्या सुमारास शोरूममधून बाहेर पडल्यानंतर अडीचच्या सुमारास कारमधून धूर येत असल्याचे त्याला दिसले, परंतु हा धूर फेरारीच्या इंजिनमधून येत होता. त्याने तातडीने कार रस्त्याच्या कडेला थांबवली, परंतु अवघ्या काही मिनिटांत कारने पेट घेतला आणि कार बघता बघता जळून खाक झाली. होनकानने सोशल मीडिया एक्सवर सविस्तर लिहिले आहे.
स्वप्नावर फिरले पाणी
एखादी नवी कोरी कार शोरूममधून घरी आणणे हे अनेकांसाठी स्वप्न असते. होनका@ननेसुद्धा 10 वर्षांपासून हे स्वप्न पाहिले होते. त्याने दररोज पैशांची बचत करत ही कार खरेदी केली होती, परंतु अवघ्या एका तासात स्वप्नातील कार जळून खाक झाल्याने होनका@नला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या कारला कोणतीही धडक बसली नव्हती. या कारच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. फेरारीच्या डिपार्टमेंटने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.