Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, 'ISIS कश्मीर' विरोधात तक्रार दाखल

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, 'ISIS कश्मीर' विरोधात तक्रार दाखल


टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याला ISIS काश्मीरकडून ही धमकी मिळाली आहे. गंभीरने 23 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आपल्यासह कुटुंबाला सुरक्षा मिळावी अशी मागणी त्याने केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गंभीरला जीवे मारण्याची धमकी सध्या सुरू असलेल्या आयपीएलमुळे गौतम गंभीर सध्या टीम इंडियापासून ब्रेकवर आहे. अलीकडेच तो त्याच्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेला होता. पण पहलगाम हल्ल्याच्या एका दिवसानंतर त्याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीने सर्वांनाच हादरवून टाकले आहे.

 

आयपीएलनंतर इंग्लंड दौरा

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावेळी गौतम गंभीर पुन्हा एकदा आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी, गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. मात्र WTC फायनलसाठी पात्र ठरण्यास भारतीय संघाला अपयश मिळाले होते.


मिशन इंग्लंड

गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका जून ते ऑगस्ट दरम्यान होईल. इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी करणे आणि ती जिंकणे यावरच गंभीरचे लक्ष नसेल. तर त्याला नवीन WTC टेबलमध्ये आपले स्थान सुधारावे लागेल.

2027 वर्ल्ड कप पर्यंत करार
टीम इंडियासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा 2027 च्या वर्ल्डकप पर्यंत करार आहे. गंभीरने त्याच्या प्रशिक्षणाखाली एक आयसीसी विजेतेपद जिंकले आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.