फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; मात्र एक हट्ट नडला, विवाहितेची निघृण हत्या
फेसबुकवर चार दिवसांपूर्वी बनलेल्या मित्राने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील मांड्या येथे ही घटना घडली आहे. फेसबुकवरील मैत्री, चार दिवसांची चेंटिंग, एक भेट आणि हत्या असा या फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा प्रवास राहिला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 28 वर्षीय प्रीतीने गेल्या गुरुवारी फेसबुकवर करोतीग्राम येथील रहिवासी पुनीतला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही तासांतच दोघांमधील संभाषण वाढले. शुक्रवारी चेंटिंग सुरू झाली, शनिवारी फोनवर दीर्घ संभाषण झाले आणि रविवारी प्रीतीने पुनीतसोबत हासनहून म्हैसूरला पोहोचले. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळं सुरू होते. म्हैसूरला पोहोचल्यावर, दोघेही शहरात फिरले आणि नंतर के. आर. एस. जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिथे त्यांचे शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र वेगात सुरु झालेली ही प्रेमकहाणी लवकरच एक वळण घेणार होती.
प्रीतीची एकत्र राहायण्याची इच्छा
लॉज सोडल्यानंतर, पुनीत तिला परत सोडण्यासाठी निघून गेला. पण वाटेत, के. आर. पेटजवळ, प्रीतीने पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. पुनीतने वारंवार विनंती करुनही प्रीती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे संतापलेला पुनीत तिला निर्जन कतारघट्टा जंगलात घेऊन गेला. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पुनीतने नकार दिल्यावर प्रीतीने त्याची चेष्टा केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कदाचित हीच थट्टा तिच्या मृत्यूचे कारण बनली.
संतापलेल्या पुनीतने आधी तिच्या जोरदार थोबाडीत दिली. यानंतर ती जमिनीवर पडली. त्यानंतर पुनीतने जवळच पडलेला एक जड दगड उचलला आणि तिच्या डोक्यावर आपटला. एकामागून एक वार झाल्यानंतर काही क्षणातच प्रीतीचा जीव गेला. दोघांच्या मैत्रीनंतर पहिल्याच भेटीचा असा अंत झाला. हत्येनंतर पुनीतने प्रीतीचा मृतदेह शेतात पुरला हत्येनंतर पुनीतने मृतदेह त्याच्या गावी नेला आणि त्याच्याच शेतात पुरला. पण गुन्हा जास्त काळ लपून राहू शकला नाही. पोलिसांनी आरोपी पुनीतला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती.
पोलिसांनी काय सांगितलं?
मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी म्हणाले, "पुनीत हा करोतीग्रामचा रहिवासी आहे. तो एका आठवड्यापूर्वीच फेसबुकद्वारे प्रीतीला भेटला होता. रविवारी तो तिला हासनहून घेऊन आला. दोघेही केएसआर लॉजमध्ये राहिले. मात्र प्रीतीने त्याच्यासोबत जास्त वेळ एकत्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात हत्येची घटना घडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.