जोहरान ममदानीच्या विजयावर अमेरिकनांचा संताप ; 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'लाच घातला बुरखा, काय आहे नेमका गोंधळ ? जाणून घ्या
गुजराती मुस्लिम आणि भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट नेते जोहरान ममदानी यांनी नुकतेच न्यू यॉर्क सिटी डेमोक्रॅटिक मेयर प्रायमरीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जर त्यांनी सार्वत्रिक निवडणूक जिंकली तर ते न्यू यॉर्क सिटीचे पहिले मुस्लिम आणि भारतीय अमेरिकन महापौर असतील. मात्र, त्यांचा विजय सध्या अमेरिकेत कोणालाही पचत नसल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे धार्मिक आणि वांशिक राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. MAGA (मेक अमेरिका ग्रेट अगेन) समर्थक आणि अतिउजवे रिपब्लिकन राजकारणी त्यांना लक्ष्य करत आहेत आणि सोशल मीडियावर इस्लामोफोबिक टिप्पण्या आणि प्रतिमा शेअर करत आहेत.
जोहरान ममदानीच्या विजयावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टूथ सोशलवर लिहिले की ते १००% कम्युनिस्ट वेडे आहेत त्यांनी त्यांच्या विजयाचे वर्णन अमेरिकेसाठी एक मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी AOC+3 (प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक ग्रुप) चीही खिल्ली उडवली आणि म्हटले की चक शूमरसारखे नेतेही आता ममदानीसमोर झुकत आहेत.दरम्यान, रिपब्लिकन नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन आणि नॅन्सी मेस यांनी बुरख्यात असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा फोटो आणि ममदानीला ९/११ शी जोडणारी पोस्ट शेअर करून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी असेही लिहिले की २०२५ मध्ये एक मुस्लिम जिहादी न्यू यॉर्कमध्ये निवडून येईल आणि २०४० मध्ये न्यू यॉर्कमध्ये शरिया कायदा पाळला जाईल अशी घोषणा केली जाईल.
मी ट्रम्पचे सर्वात वाईट स्वप्र
मुस्लिम डेमोक्रॅटिक सोशलिस्ट नेते जोहरन ममदानी यांनी एका निवेदनात म्हटले होते की मी डोनाल्ड ट्रम्पचे सर्वात वाईट स्वप्न आहे कारण एक पुरोगामी, मुस्लिम स्थलांतरित आहे जो खरोखर माझ्या विश्वासाच्या गोष्टींसाठी लढतो त्यांच्या विधानावरून असे दिसून येते की ते केवळ राजकीय विरोधाला तोंड देण्यास तयार नाहीत तर धर्मनिरपेक्षता आणि विविधतेच्या मूल्यांसाठी लढण्यास देखील तयार आहेत.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या नावाखाली लक्ष्य
ममदानीला विरोध करण्यासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या नावाखाली लक्ष्य केले जात आहे, जेव्हा त्या पुतळ्याची मूळ प्रेरणा एक मुस्लिम महिला होती. फ्रेंच कलाकार फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी यांनी या पुतळ्याची प्रेरणा इजिप्तमधील एका बुरखाधारी मुस्लिम महिला शेतकऱ्याकडून घेतली. मूळ डिझाइनमध्ये, ती कंदील धरलेली एक महिला होती, जी प्रगती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक होती. इजिप्तने प्रस्ताव नाकारल्यानंतर, पुतळ्याची पुनर्रचना रोमन देवी लिबर्टास म्हणून करण्यात आली आणि अमेरिकेला भेट म्हणून देण्यात आली
ममदानीचे राजकारण
ममदानी यांनी ट्रम्पच्या स्थलांतर धोरणाचे वर्णन अनैतिक आणि फूट पाडणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी गाझा युद्धाला नरसंहार म्हटले आहे, परंतु ते यहूदी विरोधी नाहीत असे स्पष्ट केले आहे. गव्हर्नर कुओमोच्या अब्जाधीश समर्थकांवर टीका करताना त्यांनी लोकसहभाग आणि पारदर्शकतेला महत्त्व देण्याबद्दल बोलले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.