Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अविनाश भोसलेंची सीबीआयच्या डोळ्यात धूळफेक ! अटकेत असताना चौदाशे कोटींचे हॉटेल विकले कसे ?

अविनाश भोसलेंची सीबीआयच्या डोळ्यात धूळफेक ! अटकेत असताना चौदाशे कोटींचे हॉटेल विकले कसे ?


येस बँक-डीएचएफएलमधील 34 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी ते एक होते. आता या प्रकरणात वेगळ्याचा प्रकार समोर आला आहे. अविनाश भोसले हे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी लंडनमधील आपल्या हॉटेलची विक्री केल्याचे समोर आले आहे. भोसले यांनी 2018 मध्ये लंडनमध्ये एक हजार कोटींना एक हॉटेल खरेदी केले होते. 2022 मध्ये त्यांनी 1 हजार 432 कोटींना हॉटेलची विक्री केली होती. 


घोटाळ्यातील पैशातून हे हॉटेल खरेदी केले होते. एस बँकेसह 17 बँकांकडून 34 हजार कोटी रुपयांचे बनावट कर्ज घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात डीएचफएलचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आला होता. या घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत होते. यात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा सहभाग आढळून आला होता. त्यांना 26 मे 2022 रोजी सीबीआयने अटक केली होती. त्याच गुन्ह्यात ईडीकडून भोसले यांना अटक करण्यात आली होती. त्याच काळात ईडीकडून आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू होती.

भोसलेंना अटक झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात ऑगस्ट 2022 मध्ये लंडनमधील हॉटेलची विक्री केल्याचे उघडकीस आले. 2018 मध्ये भोसले यांच्या एबीआयएल ग्रुपशी संबंधित इंग्लंडमधील कंपनी प्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडमार्फत एक हॉटेल विकत घेतले होते. तेव्हा हे हॉटेल 1000 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. हे हॉटेल डीएचएफएल घोटाळ्यातील रक्कमेतून घेतल्याचे आरोप होत होते. परंतु दुसरीकडे भोसलेंना अटक झाल्यानंतर कंपनीकडून हे हॉटेलची विक्री करण्यात आली. हे हॉटेल 1 हजार 432 कोटी रुपयांना विकण्यात आले. त्यावेळे चारशे कोटींचा नफा भोसले यांच्या कंपनीने मिळविला होता.
सीबीआयला थांगपत्ता नाही.


या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीबीआय, ईडीकडून संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत होती. 2024 मध्ये सीबीआयने अविनाश भोसले यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अविनाश भोसले यांना जामीनही मिळाला होता. पण 2022 मधील हॉटेल विक्रीची कुठलेही माहिती सीबीआयला नव्हती.

हॉटेल खरेदी कसे केले ?

हॉटेल खरेदी करण्यासाठी डीएचएफएल घोटाळ्यातील 34 हजार कोटींमधील काही रक्कम रक्कम वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. हॉटेल खरेदीसाठी दिलेल्या एक हजार कोटी रुपयांपैकी तिनेश कोटी रुपये बेकायदेशीर नफ्यातील होते. तर 700 कोटी रुपये येस बँकेकडून कर्ज म्हणून देण्यात आले होते. तेव्हा ही बँक सह-आरोपी राणा कपूर यांच्या नेतृत्वाखाली होती. फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडचा वापर करून पैसे इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे बेकायदेशीरपणे ही रक्कम पाठविल्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा आरोपही इडीने केला होता. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.