देशात सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी ‘आयुष्मान भारत योजना’ ही एक महत्त्वाची आरोग्य सेवा योजना आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतो. परंतु अनेकदा अशा तक्रारी येतात की, लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालय त्यांच्याकडून उपचारासाठी पैसे मागते. अशा वेळी सामान्य नागरिकांनी काय करावे, कुठे तक्रार करावी हे जाणून घेणे आवश्यक आहे.
आयुष्मान भारत योजनेत काय मिळतं?
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्याला वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ मिळतो. देशभरातील अनेक खासगी व सरकारी रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत.
पैसे मागितले तर काय करावे?
जर तुमच्याकडे वैध आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालय तुमच्याकडून उपचारासाठी पैसे मागत असेल, तर तुम्ही त्वरित याविरुद्ध तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला खालील पर्याय वापरता येतील:हेल्पलाइनवर तक्रार: आयुष्मान योजनेच्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांक 14555 वर कॉल करून तक्रार नोंदवता येते. कॉलवर तुम्ही संबंधित रुग्णालयाचे नाव, डॉक्टरचे नाव आणि पैसे मागितल्याचा तपशील देऊ शकता.ऑनलाइन तक्रार: तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://pmjay.gov.in जाऊनही तक्रार दाखल करू शकता. येथे तुम्हाला रुग्णालयाचे नाव, रुग्णाचे नाव, उपचाराची तारीख आणि पैसे मागितल्याची माहिती भरावी लागेल.राज्य आरोग्य यंत्रणेकडे तक्रार: प्रत्येक राज्यात आयुष्मान योजनेसाठी आरोग्य एजन्सी कार्यरत आहे. तुम्ही तुमच्या राज्यातील आरोग्य एजन्सीच्या कार्यालयात जाऊन लिखित स्वरूपात तक्रार दाखल करू शकता. योग्य ती चौकशी झाल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई होऊ शकते.
तक्रार करताना लक्षात ठेवा:
1. तुमच्याकडे उपचाराचे बिल, रुग्णालयाचे नाव व डॉक्टरचा तपशील असावा.
2. तक्रार करताना शक्य असल्यास फोन कॉलचा रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट किंवा इतर पुरावे जमा ठेवा.
शेवटी काय?
सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना गरजूंसाठी वरदान आहे. मात्र रुग्णालयांनी योजनेचा गैरवापर केल्यास नागरिकांनी जागरूक राहून तक्रार केली पाहिजे. अशी तक्रार न केल्यास भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते आणि योजनेचा मूळ उद्देश अपयशी ठरतो. त्यामुळे जर तुमच्यासोबतही अशी घटना घडली असेल, तर वेळ न घालवता तक्रार करा आणि आपला हक्क मिळवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.