गृह विभागाच्या आदेशानुसार राज्यातील ८३ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, विजय कबाडे व दीपाली काळे यांचा समावेश आहे. त्यांच्या ठिकाणी आता पदस्थापनेच्या प्रतीक्षेतील गौहर हसन व कोकण विभागातील राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अश्विनी पाटील यांची बदली सोलापूर शहरात झाली आहे. बदली झालेल्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता.
राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलिस सेवा व राज्य पोलिस सेवेतील ८३ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत. त्यात सोलापूर ग्रामीणच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची बदली पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल क्र. एकच्या समादेशकपदी झाली आहे. याशिवाय अमोल तांबे यांची बदली लातूरच्या पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. अश्विनी सानप यांच्याकडे पुणे लोहमार्गची जबाबदारी देण्यात आली आहे.
संजय जाधव यांची बदली नवी मुंबईच्या राज्य राखीव पोलिस बल क्र. ११ च्या समादेशक म्हणून बदली झाली आहे. अशा ८३ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सोलापूर शहराला तिसरा पोलिस उपायुक्त मिळाला नसून त्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, जयंत मीना यांची लातूरच्या पोलिस अधीक्षकपदी झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. दत्ता नलावडे यांची मुंबई लोहमार्गमधील पोलिस उपायुक्तपदावरील बदली देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच पंकज कुमावत यांची देखील बदली रद्द करण्यात आली आहे.
बदली झालेले अधिकारी व पदस्थापना
तेजस्विनी सातपुते : एसआरपीएफ बल क्र. एक (पुणे)अमोल तांबे : पोलिस अधीक्षक (लातूर)अश्विनी सानप : लोहमार्ग पोलिस अधीक्षक (पुणे)संजय वाय. जाधव : एसआरपीएफ बल क्र. ११ (नवी मुंबई)शीतल झगडे : पोलिस अधीक्षक (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई)निलेश मोरे : अप्पर पोलिस अधीक्षक (भंडारा)चंद्रकांत खांडवी : पोलिस अधीक्षक (पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे)मनीषा दुबले : पोलिस अधीक्षक (शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे)वैभव कलबुर्गे : अप्पर पोलिस अधीक्षक (अहिल्यानगर)प्रदीप जाधव : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती)गोकुळ राज जी. : अप्पर पोलिस अधीक्षक (गडचिरोली)दीपक देवराज : पोलिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, ठाणे)मनोज पाटील : पोलिस अधीक्षक (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)जयश्री गायकवाड : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर)प्रशांत खैरे : अप्पर पोलिस अधीक्षक (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)निकेश खाटमोडे पाटील : पोलिस अधीक्षक (अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स)अण्णासाहेब मारूती जाधव : अप्पर पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज)अजय देवरे : अप्पर पोलिस अधीक्षक (धुळे)यशवंत काळे : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)ईश्वर कातकडे : अप्पर पोलिस अधीक्षक (चंद्रपूर)रीना जनबंधू : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर)बाबुराव महामुनी : अप्पर पोलिस अधीक्षक (रत्नागिरी)अविनाश बारगळ : पोलिस अधीक्षक (पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर)माधुरी कांगणे : पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर)सुनील लांजेवार : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)अनिकेत भारती : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक)जयश्री देसाई : प्राचार्य (राज्य राखीव पोलिस बल, प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड)अशोक थोरात : समादेशक (आयआरबी राज्य राखीव पोलिस बल क्र. ४, चंद्रपूर)लक्ष्मीकांत पाटील : पालिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, नांदेड)सदाशिव वाघमारे : अप्पर पोलिस अधीक्षक (वर्धा)दिगंबर प्रधान : पालिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, नागपूर)-----------------------अजित बोऱ्हाडे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)निलेश अष्टेकर : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)वसंत जाधव : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)पवन बनसोड : पोलिस उपायुक्त (ठाणे शहर)विजय पवार : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)महेंद्र पंडित : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)तुषार पाटील : पालिस उपायुक्त (बृहन्मुंबई)सुनील लोखंडे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)स्मिता पाटील : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)श्याम घुगे : पोलिस उपायुक्त (अमरावती शहर)विनायक ढाकणे : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)कल्पना बारवकर : अप्पर पोलिस अधीक्षक (सांगली)नितीन पवार : प्राचार्य (पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, मुंबई)सुनील भारद्वाज : पोलिस अधीक्षक (मुख्यालय, महामार्ग सुरक्षा, मुंबई)प्रज्ञा जेढे : पोलिस उपायुक्त (मध्य रेल्वे, बृहन्मुंबई)समाधान पवार : पोलिस अधीक्षक (अनुसुचित जाती व जमाती आयोग, मुंबई)अशोक वीरकर : पोलिस उपायुक्त (मिरा-भाईंदर, वसई-विरार)एम. एम. मकानदार : पोलिस अधीक्षक (अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, पुणे)संदीप डोईफोडे : पोलिस उपायुक्त (मिरा-भाईंदर, वसई-विरार)अविनाश अंबुरे : समादेशक (एसआरपीएफ क्र. ८, मुंबई)जयंत बजबळे : सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था, मुंबई)राजलक्ष्मी शिवणकर : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)पंकज अतुलकर : पोलिस उपायुक्त (छत्रपती संभाजीनगर)कृषिकेश रावले : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)स्मार्तना पाटील : प्राचार्य (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडळा)अमोल झेंडे : समादेशक (एसआरपीएफ गट क्र. ७, दौंड)श्वेता खेडकर : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)रत्नाकर नवले : पोलिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, अमरावती)स्वप्ना गोरे : समादेशक (एसआरपीएफ बल गट क्र. २, पुणे)विजय कबाडे : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)सागर कवडे : पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर)नित्यानंद झा : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)अर्चना दत्ता पाटील : अप्पर पोलिस अधीक्षक (भोकर, नांदेड)किशोर काळे : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)गीता चव्हाण : पोलिस अधीक्षक (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)यागेश चव्हाण : पोलिस उपायुक्त (नाशिक शहर)खंडेराव धरणे : अप्पर पोलिस अधीक्षक (हिंगोली)भारत तांगडे : पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक)प्रशांत बच्छाव : पोलिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर)शर्मिला घार्गे : पोलिस उपायुक्त (छत्रपती संभाजीनगर)सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी : पोलिस उपायुक्त (नागपूर)शिलवंत ढवळे : पोलिस अधीक्षक (मुख्यमंत्री सुरक्षा, विशेष सुरक्षा विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)संदीप आटोळे : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)अश्विनी पी. पाटील : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)गौहर हसन : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)दीपाली काळे : समादेशक (राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. १०, सोलापूर)अभय डोंगरे : अप्पर पोलिस अधीक्षक (गोंदिया)सागर पाटील : पोलिस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई)सुनिता साळुंखे ठाकरे : पोलिस उपायुक्त (पश्चिम रेल्वे, मुंबई)सोमय मुंडे : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)भाग्यश्री नवटके : समादेशक (आयआरबी-२, गोंदिया)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.