बीडच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून मुलीचं लैंगिक शोषण, आरोपी आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. सदर प्रकरणानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सदर घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे.
आरोपी शिक्षक विजय पवार आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय-
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.
राज्य महिला आयोगानेही या घटनेची घेतली दखल-
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची प्रसारमाध्यमांवर झळकलेली बातमी पाहून राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली. उमा किरण क्लासेसमधील दोन प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याचं आयोगाने नमूद केलं आहे. आरोपी निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं व फरार आरोपींचा शोध घ्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इतर विद्यार्थिनींच्या तक्रारींचीही नोंद घ्यावी, अशी सूचना आहे. आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ ईमेलद्वारे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
नेमकी काय घटना काय?
पीडित मुलीकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे 11 वीचे अॅडमीशन घेतले असुन एप्रील 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत उज्वल अभ्यासिका येथे अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर 12.00 वा.सु मी अभ्यासीकेमधून बाहेर येण्याच्या टाईमला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवून थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस, तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाईम दुपारी 2 ते दुपारी 6 पर्यंत असायचा. मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.