Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! ६ महिन्यात १२ वेळा बलात्कार; पद्म पुरस्कार विजेत्या महंतावर महिलेचा आरोप

धक्कादायक! ६ महिन्यात १२ वेळा बलात्कार; पद्म पुरस्कार विजेत्या महंतावर महिलेचा आरोप
 

पद्मश्री पुरस्कार विजेते, महंत कार्तिक महाराज यांच्या विरोधात एका महिलेने बलात्कार, गर्भपात आणि धमकविल्याचा आरोप केला आहे. शाळेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील महिलेने केला आहे.

दरम्यान कार्तिक महाराज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. कार्तिक महाराज यांची भाजपाशी जवळीक असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, भारत सेवाश्रम संघाचे महंत कार्तिक महाराज यांनी महिलेला मुर्शिदाबाद येथील आश्रमातील शाळेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तिला आश्रमात राहण्याची सोय करून दिली. तथापि, एका रात्री महंत खोलीत शिरले आणि बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. महंतांनी २०१३ साली जानेवारी ते जून अशा सहा महिन्यात किमान १२ वेळा बलात्कार केल्याचा दावा पीडितेने केला आहे.

इतक्या वर्षांनंतर या घटनेचा उल्लेख करण्याबद्दल पीडितेने म्हटले की, दहशतीच्या सावटाखाली असल्यामुळे ती याची वाच्यता आजवर करू शकली नव्हती. पोलिसांत तक्रार केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकी महंतांनी दिली होती, असेही तक्रारदार पीडितेने सांगितले आहे. पीडितेने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. कार्तिक महाराज यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कार्तिक महाराजांनी आरोप फेटाळले
दरम्यान पद्मश्री कार्तिक महाराजांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मी एक संन्यासी आहे. महंताच्या आयुष्यात असे अनेक अडथळे येत असतात. आमचा विधी विभाग या आरोपांवर न्यायालयात उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कोलकाता मधील विधी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्याने एका २४ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता महंतावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या दोन प्रकरणांची चर्चा पश्चिम बंगालमध्ये होत असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.