लोणी काळभोर: सीताराम लांडगे महसूल विभागातील पुणे,मुंबई येथे 'साईड पोस्टिंग' प्रतिनियुक्तीवर असलेल्या ३४ उपजिल्हाधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करून महसूल मंत्र्यांनी बदलीचा 'ट्रान्सफर स्ट्राईक' केला आहे. या आधिकाऱ्यांच्या इतर विभागात असलेल्या प्रतिनियुक्त्या समाप्त करून त्यांना मूळ महसूल विभागात आणल्याने मराठवाडा, विदर्भ येथील उपजिल्हाधिकार्यांच्या रिक्त जागा भरल्या जाऊ शकतात.
महसूल विभागात कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी मूळ महसूल विभागात मनासारखी पोस्टिंग मिळाली नाही अथवा पुणे मुंबई सोडून अन्यत्र बदली झाल्यास प्रतिनियुक्तीवर साईड पोस्टिंग वर पुणे,मुंबई याच ठिकाणी राहतात परंतु शुक्रवारी महसूल मंत्र्यांनी अशा ३४ उपजिल्हाधिकारी यांचे प्रतिनियुक्ती वरील आदेश संपूष्टात आणून त्यांना मूळ महसूल विभागात समाविष्ट केले,त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून मंत्रालयातील महसूल विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल मंत्र्यांच्या या ट्रान्सफर स्ट्राईक मुळे राज्यातील महसूल विभागात मोठी खळबळ झाली आहे. एकाच वेळी प्रतिनियुक्त्या संपुष्टात आणल्याने अधिकाऱ्यांच्या पळवाटा बंद झाल्या आहेत.
सध्या मराठवाडा व विदर्भात अधिकारी जाण्यास तयार नसल्याने तेथील अनेक पदे रिक्त आहेत नागरिकांची कामे खोळंबली आहेत व तक्रारी वाढल्याने महसूल विभागाने जलदगतीने हा निर्णय घेतला हे सर्व उपजिल्हाधिकारी हे पीएमआरडीए, एमएमआरडीए, महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, नॅशनल स्टॉक एक्सन्ज, रस्ते विकास महामंडळ, सारथी, पर्यटन संचालनालय, नैना प्रकल्प, औद्योगिक विकास महामंडळ, निवडणूक आयोग, गॅस पाईप लाईन प्रकल्प, वनामती, मुद्रांक विभाग, गॅस अ्थोरेटी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाचे पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होते.महसूल विभागाने एकाच वेळी या सर्वांची येथील सेवा शुक्रवारी संपुष्टात आणून त्यांना मूळ महसूल विभागात वर्ग केले व तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. पुण्या मुंबईला ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना आता मराठवाडा विदर्भाचा रस्ता दाखवणार हे नक्की झाल्याने काहींनी सर्वांची मुंबईवारी व मंत्र्यांचे तसेच लोकप्रतिनिधीची उंभरटे झिजवायला सुरवात होणार हे नक्की, आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय भूमिका घेतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.