भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला जेली आयवजी नर्सकडून ऍसिड लावण्यात आल्याने महिलागंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. गीता जाधव (महिलेच नाव बदलल आहे) अस या प्रसूती साठी दाखल असलेल्या महिलेचे नाव असून सोनोग्राफीच्या अर्ध्या तासानंतर या महिलेने गोंडस बाळाला जन्म ही दिला आहे. सुदैवाने बाळ सुखरूप आहे.
परंतु, या घटनेनंतर महिलेल्या पोटासह अवघड जागा भाजल्याने महिलेवर उचारसुरु करण्यात आले असून ऍसिडचे इन्फेक्शन झाल्याने महिला गंभीर भाजली आहे. ग्रामीण रुग्णालयातील ब्रदर ने सोनोग्राफी रूम मध्ये औषधाच्या ट्रे मध्ये सोल्युशन यावजी ऍसिड ठेवल्याने चुकून नर्सकडून ऍसिड लागले असल्याची माहिती रुग्णालयात प्रशासनकडून नातेवाईकांना देण्यात आली आहे.
या प्रकारात महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातचं उचार केल्या जातं आहे. या घटनेने भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील भोगलं कारभार चौट्यावर आला आहे. मात्र, सोनोग्राफी दरम्याने पोटातील बाळाचे ठोके चेक करताना नर्सने पोटावर ऍसिड टाकल्यानंतर गर्भवती महिला ओरडू लागल्याने नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली असता नर्स ने त्यांच्यावरच आरडाओरड करून रुग्णालयातून दोन तास पसार झाली होती असा गंभीर आरोप ही महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.यावेळी नर्सने त्यांच्यावरच आरडाओरड करून रुग्णालयातून दोन तास पसार झाली होती असा गंभीर आरोप ही महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातचं उचार केल्या जातं आहे. या घटनेने भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.