सांगली :- श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने संचालक मंडळ सभेत सत्कार करणेत आला. हा सत्कार व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना श्री. रावसाहेब पाटील म्हणाले कि, या माध्यमातून मला तळागाळातील लोकांच्या पर्यत पोहचण्याची व त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे मी सोने करेन. शासनाच्या योजना या लोकां च्यापर्यंत पोहचविण्याचे माध्यम म्हणुन याचा वापर करेन.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री. ओ. के. चौगुले (नाना), डॉ. एस.बी. पाटील (मोटके ) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम व सेवक वर्ग उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.