Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एअर इंडियाच्या क्रॅश विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा सापडला, शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? आता समोर येणार सत्य!

एअर इंडियाच्या क्रॅश विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा सापडला, शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? आता समोर येणार सत्य!



Air India च्या क्रॅश झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा जाणून घेण्यासाठी तो परदेशात पाठवण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आता यामधील सर्व डेटा सुरक्षित असून तो इथेच कलेक्ट झाला आहे. यामध्ये अपघाताचे खरे कारण आणि शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? याचा खुलासा झाला आहे. अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचं विमान क्रैश झालं होतं. या विमान दुर्घटनेपूर्वी पायलटने कोणता मॅसेज पाठवला होता का? शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता समोर येणार आहे. विमानात असलेल्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला आहे मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या ठिकाणी मिळालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्सच्या एका भागाचे जास्त नुकसान झाले होते विमान क्रैश झाल्यानंतर त्याला लागलेल्या जोरदार फटक्यामुळे हे झाल्याचं सांगण्यात येत आहे यामुळेच ब्लॅक बॉक्स अमेरिका, ब्रिटन किंवा सिंगापुर पाठवावा यावर विचार केला जात आहे.


तर ब्लैंक बॉक्सच्या दुसऱ्या भागाची तपासणी भारतातील एका लॅबमध्ये केली जाऊ शकते ब्लॅक बॉक्सशी संबंधित महत्त्वाची माहिती२४ जून रोजी, भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाने ब्लॅक बॉक्स दिल्लीला सुरक्षितपणे आणण्यात आला. पहिला ब्लॅक बॉक्स AAIB च्या महासंचालकांनी आणला आणि दुपारी २ वाजता AAIB लॅब, दिल्लीला पोहोचला दुसरा ब्लॅक बॉक्स AAIB च्या दुसऱ्या टीमने आणला आणि संध्याकाळी ५.१५ वाजता लॅबमध्ये पोहोचला २४ जून रोजी संध्याकाळी, AAIB च्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली AAIB आणि NTSB च्या तांत्रिक पथकाने डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. २५ जून रोजी पहिल्या ब्लॅक बॉक्सच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला आणि डेटा डाउनलोड करण्यात आला

आता दोन्ही ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण केले जात आहे. जेणेकरून अपघात कसा झाला आणि त्याची कारणे काय होती हे शोधता येईल एअर इंडिया फ्लाइट AI-171 विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाचा मानला जात आहे. ब्लॅक बॉक्सचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) दोन भागात सापडला. १३ जून रोजी घटनास्थळी एका इमारतीच्या छतावर एक भाग सापडला आणि १६ जून रोजी ढिगाऱ्यातून दुसरा भाग सापडला.

या प्रकरणात AAIB ने आंतरराष्ट्रीय नियमांनुसार तज्ञांची एक टीम तयार केली. या टीमचे नेतृत्व DG, AAIB मार्फत त्यात एक एविएशन मेडिसिन तज्ज्ञ, एक हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) अधिकारी आणि यूएस NTSB चा प्रतिनिधी देखील समाविष्ट आहे. हे फायदेशीर आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ विमानाने उड्डाण केल्यानंतर ३६ सेकंदातच ते कॅश झाले. ड्रीमलाइनर विमानाच्या ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स सापडला. त्याचे दोन भाग आहेत. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर). यांना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात. हा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या कारणाबद्दल ठोस माहिती देऊ शकतो. हा ब्लॅक बॉक्स उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांच्या हालचाली जसे की उंची, वेग आणि कॉकपिटमधील संभाषणाची माहिती रेकॉर्ड करतो. 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.