स्वमुत्राने डोळे धुण्याचा नवा ट्रेंड! पुण्यातील महिलेचा मोठा दावा, अनुकरण करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला; व्हिडिओ पहा
काय आहे प्रकरण?
हा व्हिडिओ एका महिलेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या रोजच्या एका विचित्र अशा सवयीबद्दल दावा केला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, ती दररोज सकाळी उठल्यानंतर आपले डोळे स्वच्छ करण्यासाठी स्वतःच्या लघवीचा वापर करते. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी तिच्यावर प्रचंड टीका देखील केली आहे.
नुपूर पिट्टी असे या महिलेचे नाव असून 'औषधमुक्त जीवन' यावर विश्वास ठेवून त्या डोळ्यांत स्वतःची लघवी टाकतात याचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये नूपुर पिट्टी यांनी सांगितले की, त्या दररोज सकाळी त्यांच्या लघवीने डोळे धुतात. यामुळे त्यांचे कोरडे डोळे, डोळ्यांची खाज आणि डोळ्यांची लाली कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. नैसर्गिक आणि पर्यायी उपचारांवर असलेल्या विश्वासाचाच हा एक भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहे सत्य?
लघवी हा आपल्या शरीरातून बाहेर पडणारा कचरा असतो आणि ज्यामध्ये दूषित पदार्थ, जीवाणू असतात. हे जीवाणू शरीरात गेल्यावर गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकतात. त्याचा तुमच्या किडनीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, मानवी मूत्रात 95% पाणी असते आणि उर्वरित भाग युरिया, क्रिएटिनिन, अमोनिया, क्षार आणि शरीरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या हानिकारक घटकांनी बनलेला असतो. त्यात रक्तातून बाहेर पडणाऱ्या औषधांचे, हार्मोन्सचे आणि विषारी पदार्थांचे अंश देखील असू शकतात. आपल्या डोळ्यांचा पडदा खूप संवेदनशील असतो आणि त्यात असा कचरा टाकल्याने त्याच्या नैसर्गिक संरक्षणाला हानी पोहोचू शकते.
तज्ज्ञ काय सांगतात?
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. नुसरत बुखारी यांनी या विषयावर गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेली कृती अत्यंत भयानक आहे, लघवीमध्ये अनेक हानिकारक बॅक्टेरिया आणि विषारी घटक असतात, जे डोळ्यांच्या संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे डोळ्यांची गंभीर जळजळ, दृष्टी कमी होणे किंवा इतर डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांच्या कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या मनाने कोणताही उपचार करणे धोकादायक ठरू शकते. व्हिडिओ पाहून चुकूनही याचा प्रयोग करू नका. आरोग्याच्या कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच उपचार करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.