भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नुकत्याच नियुक्त झालेल्या श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे एक निःस्वार्थ सेवाभाव, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समाजाच्या उत्कर्षासाठी जिवापाड झटणारा व्यक्तिमत्त्व, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश हा केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हे, तर जैन समाजाच्या व्यापक हितासाठी, समाजातील नवतरुणांना अधिक संधी, सम्मान व दिशा मिळावी या उद्देशाने केला आहे.
दिगंबर जैन बोर्डिंग सांगली- विकास आणि नवसंजीवनी
दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा, वाचनालय, आणि २० ताखांची भोजन निधी वाढ हे उपक्रम राबवले. त्यांनी जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून नवीन १०,००० चौ.फु. ची इमारत उभारली आणि त्यामधून उत्पन्न मिळवण्यासाठी गाळ्यांचे व्यवस्थापन केले. ११ खोल्पांसाठी ११ देणगीदार मिळवणणे, हे त्यांच्या संघटन कौशल्याचे उदाहरण आहे.
समाजसंघटन आणि मूल्याधिष्ठित उपक्रम
खंडित झालेला वधू-वर मेळावा पुन्हा सुरू करून त्यांनी विवाह समस्यांवर उपाय शोधला. महावीर जयंती, दशलक्षण पर्व, तसेच सन्मती सागर महाराज यांच्या चातुर्मासाचे आयोजन हे त्यांच्या धार्मिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांनी या सगळ्या उपक्रमातून समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींना एकत्र आणून समाजाची एकजूट घडवून आणली.
दक्षिण भारत जैन सभेचे यशस्वी नेतृत्व
व्हाईस चेअरमन आणि नंतर चेअरमन म्हणून त्यांनी केलेले योगदान अतुलनीय आहे. प्रगती जिनविजय या मुखपत्राचे आधुनिकीकरण, स्कॉलरशिप निधी ५० लाखांवरून ३.५ कोटींपर्यंत वाढवणे, सांगली अधिवेशनात त्यांनी सुमारे २ कोटी रुपये निधी गोळा केला आणि 40 लाख शिल्लक निधी ठेवून अधिवेशने यशस्वीपणे पार पाडणे हे त्यांच्या प्रभावी आर्थिक व्यवस्थापनाचे उदाहरण आहे. स्वतःच्या मातोश्रींच्या नावे बोर्डिंग हॉल साठी देणगी दिली.
आरोग्य आणि महिला सक्षमीकरण
महिला आश्रमासाठी १ कोटी रुपये निधी संकलन, कोविड काळात हॉस्पिटल सुरू करणे, आरोग्य शिबिरे, जीवन संजीवनी फंडाचा विस्तार - यामुळे सामाजिक आरोग्यविषयक आवश्यक गरजा त्यांनी समर्थपणे हाताळल्या,
राजकीय प्रवेश - समाजहितासाठीचा पुढचा टप्पा
श्री. रावसाहेब पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश हा स्वतःच्या पदासाठी वा वैयक्तिक लाभासाठी केलेला नाही. त्यांचे ध्येय स्पष्ट आहे-
जैन समाजाचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडले जावेत, समाजातील तरुणांना राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात संधी
मिळाव्यात, आणि समाजाचा सशक्त आवाज राजकारणात ऐकू यावा."
त्यांनी ज्या आत्मियतेने विविध सरकारी संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करून जैन समाजाच्या शिष्यवृत्त्या, मंदिरे, सभागृहे, उद्योजकांसाठी निधी, अशा अनेक विषयांसाठी काम केले तेच त्यांनी भाजपाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जैन प्रकोष्ठ - राज्यव्यापी नेटवर्क आणि विकासाची गती
भाजपाच्या जैन प्रकोष्ठाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वामुळे या प्रकोष्ठाच्या सर्व जिल्ह्यांतील कार्यकत्यांचे संपूर्ण सहकार्य मिळून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात "जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे" काम अधिक प्रभावी आणि सुलभरित्या राबवता येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्त्या, उद्योजकांसाठी निधी, मंदिरे, सभागृहे, आरोग्य सेवा, आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या योजना घराघरात पोहोचवण्याचे सामर्थ्य त्यांच्या माध्यमातून निर्माण झाले आहे.
नेतृत्वगुण आणि प्रेरणादायी कार्यशैली
शिस्त, पारदर्शकता, कार्यनिष्ठा, आणि समर्पण ही त्यांची ओळख आहे. तन-मन-धनाने समाजासाठी झटणारे असे नेतृत्व दुर्मीळच, त्यांनी अनेक संस्था व पतसंस्थांमध्ये जबाबदारी पार पाडताना शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात समतोल साधला आहे.
श्री. रावसाहेब पाटील यांना मनःपूर्वक शुभेच्छा
त्यांची भाजपाच्या जैन प्रकोष्ठाच्या उपाध्यक्षपदी निवड ही सामाजिक सेवेच्या दशकभराच्या प्रवासाची पावती आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जैन समाजाच्या नवीन पिढीला योग्य दिशा, ऊर्जा आणि सशक्त व्यासपीठ मिळेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
"राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची शर्यत नसून, समाजाला समर्पणाची संधी असते आणि रावसाहेब पाटील हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत."
- जैन समाजाच्या वतीने अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा।
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.