वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वार, चारचाकी गाडी ड्रायव्हरला अनेकवेळा मोठा दंड ठोठावल्याचं आपण ऐकलं असेल. हेल्मेट नसणे, गाडीवर तिघे जण असणे आणि सिग्नल तोडणे अशावेळी ट्रॅफिक पोलिसांकडून ऑनलाईन दंडाची कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलीस आणि एका मुलीत भांडण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
तब्बल २२ हजार रुपयांचा दंड बसला
परभणी जिल्ह्यातील एका युवकाने ट्रॅफिक पोलिसावर आरोप केले आहेत. येथील युवकाला तब्बल थोडाथोडका नव्हे तर २२ हजार रुपयांच्या दंडाची सूचना आरटीओ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून या पोलिसावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांमधून होत आहे. या दुचाकीस्वारावर १३ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड ठोठावल्याचं सांगितलं आहे.
चुकीच्या पद्धतीने दंड लावला
आपणास लावण्यात आलेला दंड चुकीच्या पद्धतीने लावलेला असून हा दंड परत घ्यावा, अशी मागणी अॅड. विक्रमसिंह दहे या दुचाकीस्वाराने केली आहे. नियमांचे उल्लंघन करणे आणि गाडी चालवताना बोलणे या नियमांचे उल्लंघन केल्यामुळं आरटीओ अर्जुन खिंडरे यांनी ही कारवाई केली. या कारवाईची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरु आहे. आता या प्रकरणात काय होत हे लवकरच दिसून येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.