Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार गटाचे माजी सरपंच एस. आर. पाटील यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश केला :, जनसुराज्य पक्षात Incoming सुरूच

शरद पवार गटाचे माजी सरपंच एस. आर. पाटील यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश केला :, जनसुराज्य पक्षात Incoming सुरूच 
 


आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील  यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला  प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे त्यामुळे जनसुराज्य   पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे 

जनसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम  यांच्या नेतृत्वावर  विश्वास वाढल्याने जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते  हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने पक्ष बांधणी जोरात सुरू आहे आज एस आर बापू पाटील यांच्यासह   माजी व्हॉइस चेअरमनअरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार , समित पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदूम अक्षय पाटील नितीन पाटील म्हाळू कोरबु विश्वजीत पाटील याचा पक्ष प्रवेश झाला. 
 
यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर वडीचे माजी उपसरपंच राजू वजीर  उप महापौर आनंद देव माने रमेश नाईक पिंटू गौड अनिल देवकाते पंच  , उपस्थीत होते एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार, असे आश्वसन समित दादा कदम यांनी दिले,  तसेच जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन ते तीन तास बसावे लागते ,पण एक फोन वर काम करणारे  समीत दादा कदम याच्या पाठीशी उभे राहणार असे एस आर बापू पाटील  यांनी सांगितले



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.